पाथरीतील गोदावरी पात्रात तोल जाऊन पडल्याने पुण्याच्या सीएचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:54 PM2020-02-21T18:54:21+5:302020-02-21T18:57:39+5:30

धार्मिक कार्यक्रमासाठी पुण्यावरून आले होते पाथरीत

Pune CA's death in Godavari vessel at Pathari | पाथरीतील गोदावरी पात्रात तोल जाऊन पडल्याने पुण्याच्या सीएचा मृत्यू

पाथरीतील गोदावरी पात्रात तोल जाऊन पडल्याने पुण्याच्या सीएचा मृत्यू

googlenewsNext

पाथरी : गुंज खुर्द येथे धार्मिक विधीनंतर गोदावरी पात्रात आंघोळीसाठी गेले असता बुडून गोविंद रामप्रसाद शर्मा यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. गोविंद शर्मा ( ३९ ) हे पुणे येथे सीए म्हणून काम करत असत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील गुंज (खु) येथे परम पूज्य महात्माजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त २० फेब्रुवारीस धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले  होते. या कार्यक्रमासाठी पुणे येथे वास्तव्यास असलेले आणि मूळ परभणी येथील सरस्वती नगरातील रहिवाशी गोविंद रामप्रसाद शर्मा कुटुंबासह गुरुवारी सकाळी आश्रमात आले होते. 

दिवसभरातील विविध कार्यक्रम तसेच पालखी सोहळा आटपून ते सकाळी ११. ३० वाजता महात्माजी महाराज यांच्या समाधी स्थळासमोरील डोहात धार्मिक विधीसाठी उतरले. यावेळी तोल गेल्याने ते पाण्यात पडले. मात्र, पोहता येत नसल्यामुळे त्यांचा जागीच बुडून मृत्यू झाला. गोविंद हे महात्माजी संस्थान गुंज येथील विश्वस्त रमेश शर्मा यांचे पुतणे होते. त्यांच्या पाश्चात्य पत्नी, दोन मुले व आई वडील असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Pune CA's death in Godavari vessel at Pathari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.