‘पुणे राष्टhय निसर्गोपचार संस्थेसाठी एक हजार कोटींचा निधी देणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:00 AM2017-11-18T00:00:56+5:302017-11-18T00:00:59+5:30

पुणे येथील राष्टÑीय निसर्गोपचार संस्थेच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपये खर्च केला जाईल, असे केंद्रीय राज्यमंत्री (आयुष) श्रीपाद नाईक म्हणाले.

 'Pune will give Rs 1000 crore fund for National Horticulture Mission' | ‘पुणे राष्टhय निसर्गोपचार संस्थेसाठी एक हजार कोटींचा निधी देणार’

‘पुणे राष्टhय निसर्गोपचार संस्थेसाठी एक हजार कोटींचा निधी देणार’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पुणे येथील राष्टÑीय निसर्गोपचार संस्थेच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपये खर्च केला जाईल, असे केंद्रीय राज्यमंत्री (आयुष) श्रीपाद नाईक म्हणाले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘योगा विभागा’च्या उद्घाटनाकरिता औरंगाबादेत आले असताना त्यांनी लोकमतला सदिच्छा भेट दिली. लोकमतचे संपादक सुधीर महाजन आणि चक्रधर दळवी, सहायक उपाध्यक्ष संदीप विश्नोई आणि लोकमत टाइम्सचे निवासी संपादक योगेश गोले यांनी त्यांचे स्वागत केले.
महाराष्टÑ शासनाने पुणे येथे २५ हजार चौरस मीटर जागा दिली आहे. तेथे २०० खाटांचे निसर्गोपचार रुग्णालय आणि योगा केंद्र टप्प्या-टप्प्याने विकसित केले जाईल, असे वरिष्ठ संपादकीय कर्मचाºयांशी बोलताना मंत्री नाईक म्हणाले.
गेल्या तीन वर्षांतील त्यांच्या खात्याच्या उपलब्धीबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘आम्ही आयुर्वेद दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे. जागतिकस्तरावर २१ जून ‘योग दिन’ म्हणून स्वीकारला गेला आहे. ‘आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स’च्या धर्तीवर दिल्ली येथे ‘आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ आयुर्वेदा’ची स्थापना करण्यात आली आहे. येथे आधुनिक तंत्रज्ञानासह आयुर्वेदिक उपचार आणि सर्व रोगांवरील संशोधनाची सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येथे दररोज सुमारे १००० ते १२०० बाह्यरुग्ण उपचार घेतात. तसेच गोवा येथे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ आयुर्वेदा, योगा अ‍ॅन्ड नॅचरोपॅथी’ सुरू होत आहे.
आयुर्वेदचे वैद्य आणि अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांमधील वादाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नाईक म्हणाले की, शिकल्याशिवाय कोणीही एखाद्या उपचार पद्धतीद्वारा उपचार कसा करू शकेल, असा उलट प्रश्न विचारून मंत्री म्हणाले की, आयुर्वेदिक पदवीधरांसाठी (वैद्यांसाठी) एक वर्षाचा ‘क्रॅश कोर्स’ सुरू करण्यात येत आहे. जेणेकरून आपत्कालीन वेळी आयुर्वेदिक वैद्य अ‍ॅलोपॅथिक उपचार करू शकतील. शासनाने दिलेली आश्वासने आणि त्यांच्या पूर्ततेबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आम्ही १०० टक्के पूर्ततेचा दावा करीत नाही; परंतु विकास होत आहे. आम्ही सध्या कृतीकार्यक्रम आखला आहे. त्याच्या पूर्ततेसाठी वेळ लागू शकतो; परंतु आम्ही निश्चितच उद्दिष्टपूर्ती करू. पाच वर्षे आम्हाला काम करू द्या, नंतर कामाचे मूल्यमापन करा.

Web Title:  'Pune will give Rs 1000 crore fund for National Horticulture Mission'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.