सीमा राठोडच्या मारेक-यांना फाशीची शिक्षा द्या : बंजारा समाज एकवटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:36 PM2017-08-18T17:36:28+5:302017-08-18T17:43:14+5:30

हनुमंतखेडा, ता. सोयगाव येथील सीमा राठोड या अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून करणा-या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज हनुमंतखेडा अत्याचार विरोधी कृति समितीने  बंजारा आक्रोश मूक मोर्चा काढला.

Punishment of death to Bare Rathod's Marek: Banjara society united | सीमा राठोडच्या मारेक-यांना फाशीची शिक्षा द्या : बंजारा समाज एकवटला

सीमा राठोडच्या मारेक-यांना फाशीची शिक्षा द्या : बंजारा समाज एकवटला

googlenewsNext
ठळक मुद्देआक्रोश मूक मोर्चात तरुण- तरुणींचा लक्षणीय सहभाग:पारंपारिक वेशभूषेने वेधून घेतले लक्ष जोगेंद्र कवाडे व हरिभाऊ राठोड चालले मोर्चात ,त्यांनी न्यायालयीन चौकशीची केली मागणी ‘जय  सेवालाल’चे झेंडे आणि आरोपींना फाशी द्या अशी मागणी करणा-या डोक्यावर टोप्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ गृहमंत्रीपद सोडावे, कायदा व सुव्यवस्था मोडीत निघाल्याचा मोर्चेक-यांचा आरोप

ऑनलाईन लोकमत 

औरंगाबाद, दि. 18 : हनुमंतखेडा, ता. सोयगाव येथील सीमा राठोड या अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून करणा-या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज हनुमंतखेडा अत्याचार विरोधी कृति समितीने  बंजारा आक्रोश मूक मोर्चा काढला. तो भव्यदिव्य ठरला, लक्ष वेधून घेणारा ठरला. या मोर्चाने बंजारा समाजाची जणू ताकदच दाखवून दिली. मोर्चात बंजारा तरुण- तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. विधान परिषदेचे सदस्यव्दय प्रा.जोगेंद्र कवाडे व हरिभाऊ राठोड हे मोर्चात पायी चालले. सीमा राठोडचे आई वडिलही या मोर्चात सहभागी झाले होते. पण कृति समितीच्या निर्णयानुसार तीन मुलींव्यतिरिक्त मोर्चाच्या समारोपस्थळी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर झालेल्या सभेत अन्य कुणीही बोलले नाही. विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन या मुलींनीच दिले. 

सकाळपासूनच औरंगाबादचा क्रांती चौक बंजारा स्त्री- पुरुषांनी फुलत होता. तांड्यातांड्यातून बंजारा बंधू-भगिनी येतच राहिल्या. सकाळी ११ वाजता निघणारा हा मोर्चा दुपारी १ च्या सुमारास क्रांती चौकातून मार्गक्रमण करु लागला. दोन दोनच्या रांगेत  शिस्तीत हा मोर्चा सुरु झाला. मोर्चाच्या अग्रभागी भलेमोठे बॅनर धरुन पारंपारिक वेषभूषेतील बंजारा महिला चालत होत्या. त्यापाठोपाठ  बंजारा तरुणी चालत होत्या. नंतर मोठ्या संख्येने सहभागी झालेला बंजारा तरुण वर्ग होता. जवळपास प्रत्येकाच्याच हातात ‘ जय सेवालाल’चे झेंडे होते आणि बहुतेकांच्या हातात मागण्यांचे फलक झळकत होते. अनेक स्त्री- पुरुषांच्या डोक्यावर टोप्या होत्या आणि त्यावर ‘ सीमा राठोडच्या मारेक-यांना फाशी द्या’ असे लिहीलेले होते. 

यापुढे सीमा राठोड घडणार नाही..... 
मूकमोर्चा असल्यामुळे कुणीही घोषणाबाजी केली नाही. शहराच्या प्रमुख रस्त्यांवरुन हा मोर्चा दुपारी अडीचच्या सुमारास  विभागीय आयुक्तालयावर धडकला.तेथील भव्य पटांगणात मोर्चेकरी बसून गेले. तेथे झालेल्या सभेत रवीना राठोड, वृंदा पवार व भारती राठोड या तीन मुलींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तिघींनीही जय सेवालाल  म्हणत आपल्या भाषणाचा शेवट केला.


 


 

Web Title: Punishment of death to Bare Rathod's Marek: Banjara society united

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.