प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:22 AM2020-12-11T04:22:25+5:302020-12-11T04:22:25+5:30

सिल्लोड शहरात प्लास्टिक बंदीचा निर्णय बऱ्याच दिवसांपासून घेण्यात आलेला आहे. नगर परिषदेची ही पहिली कारवाई नसून यापूर्वीही नियमांचे उल्लंघन ...

Punitive action against shops that use plastic bags | प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई

प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई

googlenewsNext

सिल्लोड शहरात प्लास्टिक बंदीचा निर्णय बऱ्याच दिवसांपासून घेण्यात आलेला आहे. नगर परिषदेची ही पहिली कारवाई नसून यापूर्वीही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. शहर स्वच्छ व पर्यावरण संवर्धनासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाने प्लास्टिक बंदीचा नियम पाळवा, असे आवाहन मुख्याधिकारी सय्यद रफिक यांनी केले आहे. ही कारवाई नगर परिषदेचे मुख्याधिकारी सय्यद रफिक, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, उपमुख्याधिकारी अजहर पठाण, प्रशासकीय अधिकारी अजगर पठाण, सुनील गोरडे, प्रकल्प समन्वयक देवेंद्र सूर्यवंशी, अलका सूर्यवंशी, सुनीता आरके, शेख अजीम, अनवर पठाण, गोरख धाडगे, दीपक दाभाडे, विलास तावडे आदींसह नगर परिषद कर्मचारी तसेच पोलिसांनी केली.

फोटो : कॅप्शन सिल्लोड येथे प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या दुकानांवर सिल्लोड नगर परिषदेने दंडात्मक कारवाई केली.

Web Title: Punitive action against shops that use plastic bags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.