घाटनांद्र्यात नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:03 AM2021-05-01T04:03:56+5:302021-05-01T04:03:56+5:30

घाटनांद्रा येथे गुरुवारी काही व्यावसायिक दुकानाचे अर्धे शटर उघडे ठेवून व्यवसाय करीत होते. महसूल व पोलीस प्रशासनाने या व्यावसायिकांविरोधात ...

Punitive action against traders who break the rules in Ghatnandra | घाटनांद्र्यात नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

घाटनांद्र्यात नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

googlenewsNext

घाटनांद्रा येथे गुरुवारी काही व्यावसायिक दुकानाचे अर्धे शटर उघडे ठेवून व्यवसाय करीत होते. महसूल व पोलीस प्रशासनाने या व्यावसायिकांविरोधात धडक मोहीम राबविली. अशा व्यावसायिकांकडून दंड वसूल करण्यात आला. पथक गावात आल्याचे माहिती पडताच इतर व्यावसायिकांनी पटापट दुकाने बंद केली. थोड्याच वेळात रस्त्यांवर दिसणारी गर्दीही गायब झाली. पथकाने एका दिवसात तब्बल १३ हजार ९०० रुपये दंड वसूल केला. कारवाईदरम्यान काही व्यावसायिकांनी अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालून अरेरावीची भाषा केल्याने त्यांच्यावर सरकारी कामात व्यत्यय आणल्याप्रकरणी कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पथकाने दिला.

सिल्लोड तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी शंकरलाल जैस्वाल, गिरदावर निकाळजे, तलाठी काथार, पोलीस चव्हाण, सूर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर मुकणे, सरपंच पती यासीन तडवी आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

फोटो :

घाटनांद्रा येथे दुकान उघडे ठेवणाऱ्या व्यावसायिकावर कारवाई करताना पथक.

300421\datta revnnath joshi_img-20210430-wa0009_1.jpg

घाटनांद्रा येथे दुकान उघडे ठेवणाऱ्या व्यवसायिकावर कारवाई करताना पथक.

Web Title: Punitive action against traders who break the rules in Ghatnandra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.