दररोज १० हजार तपासण्यांसाठी २.५० लाख अँटिजेन कीटची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:03 AM2021-04-03T04:03:26+5:302021-04-03T04:03:26+5:30
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणावरही भर देण्याचे आदेश पालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने ...
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणावरही भर देण्याचे आदेश पालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. लसीकरणाची मेगा मोहीम राबवली जाणार आहे, त्याच बरोबर टेस्टची मोहीमदेखील राबवली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या दररोज साडेचार हजार कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. ही संख्या दहा हजारापर्यंत नेण्यात येणार आहे, त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. महापालिकेने २ लाख ५० हजार अँटिजेन कीट खरेदी केल्या आहेत. पूर्वीचे १ लाख कीट शिल्लक आहेत. त्यामुळे अँटिजेन कीटची संख्या ३ लाख ५० हजार झाली आहे. यापैकी काही कीट जिल्हा परिषदेला आणि काही कीट जिल्हा सामान्य रुग्णालयाला दिली जातील. आरटीपीसीआर टेस्टच्या १ लाख कीट महापालिकेकडे आहेत. दोन्हीही प्रकारच्या कीटची संख्या पुरेशी असल्यामुळे चाचण्यांचे प्रमाण लगेच वाढवले जाईल. त्यातून कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येला आळा घालता येईल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला.