सांडपाण्यापासून बनले पिण्याचे शुद्ध पाणी
By Admin | Published: May 4, 2016 01:21 AM2016-05-04T01:21:43+5:302016-05-04T01:30:22+5:30
औरंगाबाद : कसलीही रासायनिक प्रक्रिया न करता गांडूळ खताच्या माध्यमातून सांडपाण्याचे रूपांतर पिण्याच्या शुद्ध पाण्यात करण्याचा प्रकल्प ज्येष्ठ उद्योजक राम भोगले
औरंगाबाद : कसलीही रासायनिक प्रक्रिया न करता गांडूळ खताच्या माध्यमातून सांडपाण्याचे रूपांतर पिण्याच्या शुद्ध पाण्यात करण्याचा प्रकल्प ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी सुरू केला आहे. अवघ्या तीन रुपयांत एक हजार लिटर शुद्ध पाणी या प्रकल्पातून मिळते. सध्या प्रायोगिक तत्त्वावर दररोज दहा हजार लिटर सांडपाणी पिण्यायोग्य बनविले जात आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेस या पाण्याचा मोफत पुरवठा केला जात आहे.
रेल्वेस्थानक औद्योगिक वसाहतीतून शहराचे दूषित पाणी घेऊन भलामोठा नाला वाहतो. परिसरातील नागरिक या नाल्यास ‘गंदा नाला’ म्हणून ओळखतात. नाल्याची कल्पना येण्यास हे नाव पुरेसे बोलके आहे. (पान २ वर)1
नाल्याशेजारी विहीर खोदण्यात आली आहे. नाल्यातील पाणी झिरपून ही विहीर तुडुंब भरत असते. विहिरीतील सांडपाणी पाच हजार लिटर क्षमतेच्या टाकीत घेतले जाते. त्यानंतर हे पाणी ‘बायोफिल्टर’ यंत्रात आणले जाते. यंत्रावर ४०० लिटर क्षमतेच्या टाकीत हे पाणी येते. तेथून गांडूळ खतांचा समावेश असलेल्या तीन ‘कंपार्टमेंट’मध्ये सोडले जाते.
2गांडूळ खत व इतर ‘बायोमीडिया’सोबत प्रक्रिया होऊन हे पाणी इतर टाक्यांत साठविले जाते. हे पाणी रासायनिक खतांना अतिशय चांगला पर्याय आहे. काही प्रगतिशील शेतकऱ्यांनी या पाण्यातून फळे, भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले आहे. पिण्यायोग्य करण्यासाठी पुढे हे पाणी ‘नॅनोफिल्टर’मध्ये नेले जाते. पाण्याची दुर्गंधी व पिवळसरपणा काढून टाकून ते पिण्यायोग्य बनविले जाते. (पान २ वर)