पूर्णा नदी अन् खटकाळी नाल्याला पूर, ६ गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:03 AM2021-09-08T04:03:31+5:302021-09-08T04:03:31+5:30
चिंचोली लिंबाजी : परिसरात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धो-धो धुतले आहे. पूर्णा नदीला व खटकाळी नाल्याला पूर ...
चिंचोली लिंबाजी : परिसरात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धो-धो धुतले आहे. पूर्णा नदीला व खटकाळी नाल्याला पूर आल्याने वाकीफाटा, घाटशेंद्रा, चिंचोली लिंबाजी, घाटनांद्रा या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी पूर्णा नदीच्या उत्तरेकडील सहा गावांचा संपर्क मंगळवारी रात्री उशिरापर्यंत तुटला होता. दुसरीकडे सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
चिंचोली लिंबाजी, नेवपूर, वाकीफाटा, घाटशेद्रा, रेऊळगाव, टाकळी अंतुर, तळणेर, वडोद, लोहगाव, बरकतपुर, रायगाव, वाकद, गणेशपूर, जामडी, दहीगाव, शेलगाव, दिगावखेडी परिसरात सोमवारी दुपारी चार वाजेपासून वरुणराजाने जोरदार आगमन केले ते मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत ही संततधार सुरूच होती. पूर्णा-नेवपूर प्रकल्प शंभर टक्के भरल्याने पूर्णानदी दुथडी भरून वाहत आहे. पूर्णा नदीवरील वाकी, नेवपूर, बरकतपूर, दिगाव येथे कमी उंचीचे पूल असल्याने पाऊस झाल्यास या गावातील संपर्क वारंवार तुटत आहे. नेवपुरातील फरशी पूल पूर्णपणे वाहून गेल्याने हा मार्ग आठ दिवसांपासून बंदच आहे.
070921\20210907_135917.jpg
चिंचोली लिंबाजी-घाटनांद्रा रस्त्यावरील खटकाळी नाल्या वरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने १० तास वाहतूक ठप्प।होती