परळीत उपकेंद्र बनले शोभचे बाहुले!

By Admin | Published: November 13, 2014 12:24 AM2014-11-13T00:24:20+5:302014-11-13T00:53:04+5:30

सिद्धेश्वर मुंडे, नंदागौळ परळी तालुक्यातील आरोग्ययंत्रणा तर पूर्णत: ढेपाळलेली आढळून आली़ तालुक्यातील उपकेंद्र तर केवळ नावालाच उरले आहेत की काय? असा प्रश्न पडावा इतकी वाईट अवस्था होती़

Purneetan became the epicenter! | परळीत उपकेंद्र बनले शोभचे बाहुले!

परळीत उपकेंद्र बनले शोभचे बाहुले!

googlenewsNext


सिद्धेश्वर मुंडे ल्ल नंदागौळ
परळी तालुक्यातील आरोग्ययंत्रणा तर पूर्णत: ढेपाळलेली आढळून आली़ तालुक्यातील उपकेंद्र तर केवळ नावालाच उरले आहेत की काय? असा प्रश्न पडावा इतकी वाईट अवस्था होती़ प्रतिनिधी दादाहरी वडगाव, सारडगाव उपकेंद्रांमध्ये दुपारी अनुक्रमे बारा, दीड वाजेच्या सुमारास गेले़ दादाहरी वडगाव येथील केंद्र तर चक्क कुलूपबंद होते़ तेथे ना आरोग्य कर्मचारी होते ना आरोग्य सेविका़
उपकेंंद्र कधीतरीच उघडते हे माहीत असल्याने रुग्णांचीही तेथे फारसी गर्दी नव्हती़ तेथील आरोग्यसेवक एस़ बी़ चाटे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता तो ‘स्वीचआॅफ’ होता़ सारडगावात उपकेंद्र सुरु होते; परंतु तेथे केवळ एकच आरोग्य सेविका उपस्थित होत्या़ रुग्णांची वर्दळ कमीच होती़
साथरोगांचा उद्रेक सुरु असताना तालुक्यातील आरोग्य केंद्रांमध्ये असे विदारक चित्र असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कोणाचा अंकुश आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे़ महत्त्वाचे म्हणजे सरकारी उपचार मिळत नसल्याने लोकांना खासगी दवाखाने गाठल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही़ शहराजवळील रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात येतात;पण रुग्णांची वाढती संख्या पाहता सुविधांची वाणवाच असल्याच्या तक्रारी आहेत़

Web Title: Purneetan became the epicenter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.