बेपत्ता व्यक्तीचा विहिरीत ढकलून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 11:09 PM2019-04-21T23:09:26+5:302019-04-21T23:09:46+5:30

औरंगाबाद : दि. ९ एप्रिलपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा पैशाच्या वादातून विहिरीत ढकलून खून केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी ...

Pushing the missing person's well into the well | बेपत्ता व्यक्तीचा विहिरीत ढकलून खून

बेपत्ता व्यक्तीचा विहिरीत ढकलून खून

googlenewsNext
ठळक मुद्देपैशाचा वाद : जालना जिल्ह्यातील मौजपुरी परिसरात आढळला मृतदेह

औरंगाबाद : दि. ९ एप्रिलपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा पैशाच्या वादातून विहिरीत ढकलून खून केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
विजय देवीदास सुर्वे (४१, रा. शंभूनगर) असे मृताचे नाव आहे. त्यांची पत्नी पुष्पा या शहरातील एका खाजगी रुग्णालयात परिचारिका आहेत. त्यांना मुलगा आणि मुलगी आहे. ९ एप्रिल रोजी पुष्पा सुर्वे या कामावरून घरी आल्या असता मनोज शहादेव गवळी (रा. इंदिरानगर) आणि विजय सुर्वे यांच्यात वाद सुरू होता. गवळी हा विजय यांना सोबत चल म्हणून हट्ट करीत होता. त्यानंतर विजय सुर्वे पत्नीची दुचाकी (एमएच-२० डीवाय-५७९४) घेऊन निघून गेले. तेव्हापासून ते बेपत्ता होते. याबाबत त्यांच्या पत्नीने जवाहरनगर पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. १२ एप्रिल रोजी मनोज गवळी दोन वेळा सुर्वे यांच्या घरी गेला. त्याने विजय सुर्वेबाबत पुष्पाकडे विचारणा केली. तसेच सावरगाव (जि. जालना) येथे चला तीन तासांत विजय कुठे आहे ते दाखवतो, असेही मनोज गवळीने त्यांना सांगितले. त्यामुळे मनोज गवळीवर सुर्वे कुटुंबियांचा संशय बळावला होता. याच दरम्यान मौजपुरी ठाण्यातून पुष्पा सुर्वे यांच्या भावाला पोलिसांचा फोन आला. त्यांनी खात्री केल्यानंतर विहिरीतील मृतदेह विजय सुर्वे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी मनोज गवळीविरुद्ध जालना जिल्ह्यातील मौजपुरी ठाण्यात गुन्हा नोंद केल्यानंतर तो जवाहरनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

- जिवे मारण्याची धमकी दिली होती
मनोज गवळी किरायाने राहतो. किरायाच्या पैशाबाबत विजय सुर्वे यांनी त्याच्या घरमालकासोबत तडजोड करून दिली होती. २८ मार्चला सकाळी सुर्वे यांचा घरामागे राहणाऱ्या एका महिलेसोबत ड्रेनेजवरून वादही झाला होता. तेव्हा विजय सुर्वे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, असेही तक्रारीत नमूद आहे.

Web Title: Pushing the missing person's well into the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.