्र्र‘पशुधन विमा योजना जिल्ह्यात लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2016 12:06 AM2016-07-25T00:06:58+5:302016-07-25T00:42:05+5:30

बीड : लाखमोलाच्या पशुधनांना आता विमासंरक्षण मिळणार आहे. राज्य पशुधन महामंडळातर्फे विमा योजना लागू करण्यात आली आहे.

'Pushthan Insurance Scheme implemented in the district | ्र्र‘पशुधन विमा योजना जिल्ह्यात लागू

्र्र‘पशुधन विमा योजना जिल्ह्यात लागू

googlenewsNext


बीड : लाखमोलाच्या पशुधनांना आता विमासंरक्षण मिळणार आहे. राज्य पशुधन महामंडळातर्फे विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील पशुधनमालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प. उपाध्यक्षा आशा संजय दौंड यांनी रविवारी केले.
जिल्ह्यात ८ लाख २६ हजार ८६४ एवढी जनावरे आहेत. नैसर्गिक व अपघाती संकट कोसळल्यानंतर पशुधन दगावल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असे. त्यामुळे जनावरांनाही विमा सुरक्षा कक्षेत आणले आहे. पशुधन विमा योजनेच्या प्रभावी अंमलबावणीसाठी १ ते १५ आगस्ट या दरम्यान विशेष शिबीरे घेण्याचे आदेश पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप यांनी जि.प. च्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार नियोजन शिबीर आहे. विमा कंपनीने विमा उतरविण्यासाठी एजंट नेमले आहेत. जास्तीत जास्त पशुपालकांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी जि. प. कटीबद्ध आहे, असे दौंड यांनी सांगितले. विमा हफ्त्यासाठी दारिद्र्यरेषेखालील तसेच अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांना शासनाकडून ७० टक्के अनुदानाची तरतूद आहे तर सर्वसाधारण लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदान मिळणार आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे आरोग्य प्रमाणपत्र, पशुधनासोबतचा मालकाचे छायाचित्र, बँक खात्याचा तपशील आदी माहितींसह विमा उतरविता येणार आहे. विमा उतरविलेल्या जनावरांना कंपनीतर्फे कानात बिल्ला लावण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Pushthan Insurance Scheme implemented in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.