लाभार्थ्यांना ठेवले अंधारात

By Admin | Published: February 18, 2016 11:31 PM2016-02-18T23:31:27+5:302016-02-18T23:44:24+5:30

मानवत :दुष्काळी स्थितीत शासनाने अन्नसुरक्षा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी योजना राबविली खरी मात्र या योजनेबाबत अनेक शेतकरी लाभार्थी अनभिज्ञ असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Put the beneficiaries in the dark | लाभार्थ्यांना ठेवले अंधारात

लाभार्थ्यांना ठेवले अंधारात

googlenewsNext

मानवत :दुष्काळी स्थितीत शासनाने अन्नसुरक्षा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी योजना राबविली खरी मात्र या योजनेबाबत अनेक शेतकरी लाभार्थी अनभिज्ञ असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
शासनाने मागील तीन वर्षांची दुष्काळी परिस्थिती व नापिकी लक्षात घेत अन्न सुरक्षा योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली. या योजने अंतर्गत एपीएल शिधापत्रिकाधारकांचा योजनेत समावेश केला आहे. यासाठी शेतकऱ्यांना घोषणापत्र व सात-बाराचा उतारा पुरवठा विभागाकडे दाखल करावयाचा होता. त्याच्या पडताळणीनंतर शेतकऱ्यांची नावे यादीत समाविष्ट करावयाची होती. परंतु, हे कागदपत्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी दाखल न करता स्वस्तधान्य दुकानदारांनीच परस्पर दाखल केली. परिणामी अनेक शेतकरी योजनेबाबत अनभिज्ञ राहिले व धान्यापासूनही वंचित राहिले. मानवत तालुक्यात ४ हजार ७८७ कुटुंबातील २७ हजार १८५ सदस्यांना ८१५ क्विंटल गहू आणि ५४३ क्विंटल तांदूळ वितरित होत आहे.
असे असले तरी एवढे धान्य लाभार्थी शिधापत्रिकाधारक व सदस्यांपर्यंत पोहचत नाही, अशा तक्रारी आहेत. कोल्हावाडी या छोट्यागावात ३२ शेतकरी लाभार्थी असताना ८२ कुटुंबांचे धान्य पुरवठा विभागाने दिले. नंतर हा प्रकार उघडकीस आला. छोट्याशा गावात एवढा मोठा घोटाळा होत असल तर इतर गावांचा विचार करता या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे, याचा अंदाज येतो. (वार्ताहर) (क्रमश:)

Web Title: Put the beneficiaries in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.