मास्क लावा; अन्यथा फौजदारी कारवाई- तहसीलदार वारकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:04 AM2021-03-06T04:04:26+5:302021-03-06T04:04:26+5:30

बैठकीला मार्गदर्शन करताना वारकड म्हणाले की, तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे व सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा प्रत्येकाने वापर करावा. ...

Put on a mask; Otherwise criminal action - Tehsildar Warkad | मास्क लावा; अन्यथा फौजदारी कारवाई- तहसीलदार वारकड

मास्क लावा; अन्यथा फौजदारी कारवाई- तहसीलदार वारकड

googlenewsNext

बैठकीला मार्गदर्शन करताना वारकड म्हणाले की, तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे व सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा प्रत्येकाने वापर करावा. प्रशासनाने नेमलेले पथक दिसताच बरेच लोक चेहऱ्याला मास्क लावतात, पथक निघून गेले की मास्क काढून टाकतात हे योग्य नाही. लोकांनी मास्क लावले नाही तर दंडात्मक कारवाईसह फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तालुक्यामध्ये आजरोजी एकूण ५५ रुग्ण आहेत. त्यापैकी ४२ रुग्ण कन्नड येथे उपचार घेत आहेत व १३ रुग्ण औरंगाबाद येथे उपचार घेत आहेत. जवळपास ५५ पैकी ३९ रुग्ण शहरांमधील आहेत. उपरोक्त बैठकीस व भेटीदरम्यान शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर रेंगे, ग्रामीणचे पोनि. सुनील नेवसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. देगावकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लांजेवार, मुख्याधिकारी हारुन शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार इत्यादी हजर होते.

Web Title: Put on a mask; Otherwise criminal action - Tehsildar Warkad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.