आरटीपीसीआर चाचणीनंतर क्यूआर कोड अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:04 AM2021-09-22T04:04:12+5:302021-09-22T04:04:12+5:30

औरंगाबाद : आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर क्यूआर कोडसह तपासणी अहवाल नागरिकांना देण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अहवाल देणारी ...

QR code report after RTPCR test | आरटीपीसीआर चाचणीनंतर क्यूआर कोड अहवाल

आरटीपीसीआर चाचणीनंतर क्यूआर कोड अहवाल

googlenewsNext

औरंगाबाद : आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर क्यूआर कोडसह तपासणी अहवाल नागरिकांना देण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अहवाल देणारी औरंगाबाद महापालिका देशातील पहिली ठरली आहे. या निर्णयामुळे आता बोगस अहवालाला आळा बसेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला.

मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ऑगस्टपासून अहवाल देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत तपासणी केलेल्या ५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे क्यूआर कोड असलेले अहवाल औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या ‘माझी हेल्थ माझ्या हाती’ या ॲपवर उपलब्ध आहेत. क्यूआर कोड असल्यामुळे रिपोर्ट खरा असल्याची खात्री मिळते. त्यामुळे खोटा अहवाल देऊन फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसेल, असा दावाही मनपाने केला आहे.

कसा मिळवणार तुमचा अहवाल

चाचणी केल्यानंतर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर एक एसएमएस येतो. त्यात तुमचा एसआरएफआई आयडी नमूद असेल.

त्यानंतर १२ तासांनंतर एसएमएसद्वारे एक लिंक आलेली असते. त्या लिंकवर आपला एसआरएफआयडी आणि मोबाईल नंबर टाकावा. त्यावर तुमची चाचणी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे तुम्हाला कळेल. याच अहवालात तुमच्या चाचणीचा क्यूआर कोड देखील देण्यात आलेला आहे.

दुसरी पद्धत

औरंगाबाद महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी औरंगाबाद यांनी 'माझी हेल्थ माझ्या हाती' (एमएचएमएच) ॲप तयार केले आहे. हे ॲप डाऊनलोड करून टेस्ट रिपोर्ट यावर क्लिक करावे. नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक आणि एसआरएफ आयडी त्यात टाकावा लागेल. त्यानंतर तुमचा क्यूआर कोड असलेला अहवाल उपलब्ध होईल.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. त्याचबरोबर या चाचणीचे रिपोर्ट क्यूआर कोड स्वरूपात असणे बंधनकारक आहे. महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी औरंगाबाद यांनी पुढाकार घेऊन यासाठी काम केले आणि या प्रकारची सुविधा देण्याबद्दल देशात सर्वात प्रथम येण्याचा मान मिळवला.

आस्तिक कुमार पाण्डेय, प्रशासक, मनपा.

Web Title: QR code report after RTPCR test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.