मनपा शाळेचीही गुणवत्ता वाढली
By Admin | Published: June 29, 2014 12:46 AM2014-06-29T00:46:30+5:302014-06-29T01:04:10+5:30
औरंगाबाद : शहाबाजार येथील मनपाच्या उर्दू माध्यमातील इयत्ता दहावीचा निकाल ९६ टक्के लागला असून, आता मनपा शाळेनेही गुणवत्तेमध्ये उच्चांक गाठला आहे.
औरंगाबाद : शहाबाजार येथील मनपाच्या उर्दू माध्यमातील इयत्ता दहावीचा निकाल ९६ टक्के लागला असून, आता मनपा शाळेनेही गुणवत्तेमध्ये उच्चांक गाठला आहे. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थी -विद्यार्थिनींचा गौरव समारंभ उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांनी दहावीत आपली गुणवत्ता सिद्ध करून महानगरपालिका शाळेचा खालावलेला दर्जा उंचावल्याचा आनंद विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंदाच्या चेहऱ्यावर दिसत होता. मनपा आयुक्त डॉ. कांबळे यांनी सर्व शाळेतील शिक्षकांना मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे अधिक लक्ष दिलेच पाहिजे, त्यासाठी अधिक परिश्रम केल्यास त्यातून मिळणारा आनंद वेगळाच असतो. अनेक उदाहरणे देऊन आणि मुलांच्या पुस्तकांपासून शिकवणीपर्यंतच्या सर्वच अडचणी समजावून घेतल्या आणि त्याचे तात्काळ निराकरण केले. त्यामुळे शैक्षणिकतेमधील मरगळ यशस्वी भरारी मारून विद्यार्थी- विद्यार्थिनींनी झटकून टाकत ‘हम भी किसीसे कम नही’ याप्रमाणे बौद्धिक ताकद दाखवून दिली. याचा अभिमान असल्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी गुणवंतांच्या सत्कारप्रसंगी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.
आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले की, शहरातील विकासकामात एखाद्या रोडचे काम थांबले तरी चालेल; परंतु शिक्षणासाठी तडजोड नको, असे सांगून वर्षभर पुस्तकांपासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत व वाढीव तासिकांवरही लक्ष देऊन गुणवत्ता का वाढत नाही, यासाठी प्रयत्नशील होतो. अखेर मुलांनी गुणवत्ता सिद्ध केल्याने इतर खाजगी शाळांचेही विद्यार्थी प्रवेश घेत असल्याने हे मनपाच्या शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे यश असल्याचे डॉ. कांबळे म्हणाले.
कार्यक्रमास संयोजक नगरसेवक मीर हिदायत अली, नगरसेवक सुरेश इंगळे, माजी नगरसेवक किशोर तुळसीबागवाले, मोहसीना बिल्किस, अनिल इरावणे, किरण डोणगावकर, शिक्षणाधिकारी अब्दुल मजीद, श्ोख मुनीर, सरफोद्दीन, मौलाना शम्मीउल्ला नदवी आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक नगरसेवक मीर हिदायत अली यांनी केले. सूत्रसंचालन शेख रशीदउन्निसा कुरैशी यांनी केले. आभार रईसा अय्युब खान यांनी मानले.
पंजाबी सूट व पँट- शर्टचे वाटप
वॉटर प्युरिफायरचे लोकार्पण
उर्दूमध्ये सुरेख गीत सादर
फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत
गुणवत्तेचा आलेख ८० वरून ९० टक्क्यांवर नेणार
तासिका शिक्षकांचा सत्कार
स्पर्धात्मक अभ्यासाचा सल्ला