प्रश्नपत्रिकेतच चुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:41 AM2017-07-23T00:41:22+5:302017-07-23T00:44:15+5:30

नांदेड : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने भावी शिक्षकांसाठी शनिवारी दुपारच्या सत्रात घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) प्रश्नपत्रिकेत असंख्य चुकाच चुका छापल्याने

The question papers have already been forgotten | प्रश्नपत्रिकेतच चुका

प्रश्नपत्रिकेतच चुका

googlenewsNext

भारत दाढेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने भावी शिक्षकांसाठी शनिवारी दुपारच्या सत्रात घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) प्रश्नपत्रिकेत असंख्य चुकाच चुका छापल्याने परीक्षार्थी गोंधळून गेले़ चुकीचे शब्द योग्य करण्यातच त्यांचा वेळ गेल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली़
शहरातील ४७ केंद्रावर शनिवारी दोन सत्रात परीक्षा घेण्यात आली़ पेपर एकसाठी २८ केंद्रावर सकाळी साडेदहा ते दुपारी एक व पेपर दोनसाठी १९ केंद्रावर दुपारी २ ते साडेचार या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली़ मराठी इंग्रजी व उर्दू माध्यम पेपर एकसाठी ९ हजार ७० पैकी ८ हजार ५५७ परीक्षार्थ्यांनी तर तर पेपर दोनसाठी ६ हजार ३८५ पैकी ६ हजार ४९ परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली़ एकूण १४ हजार ६०६ परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली़ पहिल्या पेपरला ५१३ तर दुसऱ्या पेपरला ३३६ परीक्षार्थी अनुपस्थित होते, अशी माहिती परीक्षा समन्वयक शिक्षणाधिकारी शिवाजी खुडे यांनी दिली़
या परीक्षेसाठी कडक नियम करण्यात आले होते़ परीक्षा केंद्रात मोबाईल, कॅमेरा, डिजिटल डायरी, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, पुस्तके, वह्या, पेन घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली होती़
परीक्षार्थींना हॉलमध्ये पेन पुरविण्यात आल्या़ पोलीस बंदोबस्तात ही परीक्षा अत्यंत कडक नियमात पार पडली़ असे असले तरी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने काढलेल्या पेपर- २ मधील प्रश्नपत्रिकेतील असंख्य चुकांमुळे या परीक्षेचा ‘दर्जा’ समोर आला आहे़ विशेषत: मराठी व्याकरणावर विचारलेल्या प्रश्नातील शब्दाच्या चुका तर हास्यास्पद होत्या़
अनेक शब्द चुकीचे छापल्यामुळे परीक्षार्थ्यांना प्रश्नांचा ताळमेळ लागत नव्हता़ प्रश्नातील नेमका शब्द कोणता असेल, याच विचारात परीक्षार्थी पडले होते़ अनेक शब्द चुकीचे छापल्यामुळे या परीक्षेचे गांभीर्यच उरले नाही़ पेपर- २ मधील प्रश्नपत्रिकेत काही चुकीचे शब्द पुढीलप्रमाणे छापण्यात आले होते- मंउळीस (मंडळीस), पाळकांचे (पालकांचे), करणान्यांचा (करणाऱ्यांचा), पाळणन्या (पाळणाऱ्या), राखादी (एखादी), स्मरणशवली (स्मरणशक्ती), अशिक्षिन (अशिक्षित), मोकळया (मोकळ्या), संख्येळा (संख्येला), मुळीचा (मुलीचा), विधार्थ्यांचे (विद्यार्थ्यांचे), रकापेशी (रक्तपेशी), मांडवलशाहीची (भांडवलीशाहीची), धरण्यातील (घराण्यातील), लण्करी(लष्करी), लक्षद्वीप (लक्षद्वीप), वायाचा (वायूचा), प्रतिलास (प्रतितास), रक्बी (रबी), भंड (थंड), इस्यायलच्या (इस्त्रायलच्या), पटदती (पद्धती), बौधिक (बौद्धिक), उताप्यातून (उताऱ्यातून), विचारलेटया (विचारलेल्या), वडिलोना (वडिलांना), प्रमाणान (प्रमाणात), भावनांमछील (भावनांमधील), कोणत्वा (कोणत्या), ध्यावे (घ्यावे), रोकण्यात (ऐकण्यात) अशा अनेक शब्दांच्या चुका आहेत़

Web Title: The question papers have already been forgotten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.