पाणी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

By Admin | Published: November 8, 2015 11:42 PM2015-11-08T23:42:00+5:302015-11-08T23:42:00+5:30

व्ही़एसक़ुलकर्णी , उदगीर उदगीर शहरासाठी लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा योजना राबविण्याची प्रस्तावित योजना गेल्या अनेक वर्षांपासून विचाराधीन आहे़

Question on water reservation on the anagram | पाणी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

पाणी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

googlenewsNext


व्ही़एसक़ुलकर्णी , उदगीर
उदगीर शहरासाठी लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा योजना राबविण्याची प्रस्तावित योजना गेल्या अनेक वर्षांपासून विचाराधीन आहे़ या प्रकल्पातील पाणी उदगीर शहरासाठी देणे शक्य नसल्याचे सांगून जलसंपदा विभागाने हात झटकले असतानाही ही योजना राबविण्यासाठी लोकप्रतिनिधी व उदगीर नगरपरिषदेकडून पाठपुरावा सुरुच आहे़
उदगीर शहरासाठी नांदेड जिल्ह्यातील मन्याड नदीवर बांधण्यात आलेल्या लिंबोटी प्रकल्पातील पाणी मिळवण्यासाठी नगरपरिषदेने २००९-१० मध्ये प्रस्ताव सादर केला होता़ मात्र, या प्रकल्पातील पाणी कंधार-अहमदपूर व लोहा या तालुक्यातील गावांसाठी आरक्षित करण्यात आल्यामुळे उदगीर शहरासाठी या प्रकल्पातील पाणी मिळणार नसल्याचे जलसंपदा विभागाने फेब्रुवारी २०११ मध्ये नगरपरिषदेस कळवून हात झटकले होते़
१२५ कोटी रुपयांची ही योजना तयार करण्यात आली होती़ या योजनेतून ६५ कि़ मी़ लांबीची पाणी वितरण व्यवस्था उभारण्यात येणे अपेक्षित होती़ राज्याच्या तत्कालिन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्र्यांना उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांनी लिंबोटी प्रकल्पातून उदगीर नगरपरिषदेच्या वाढीव पाणी आरक्षण प्रस्तावास तात्काळ मंजुरी देण्याच्या बाबतीत मागणी केली असता राज्याच्या या विभागाच्या कक्ष अधिकारी गौरी पवार यांनी जलसंपदा विभागास कार्यवाही करण्याचे आदेश आॅगस्ट २०१३ मध्ये दिले होते़
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २७ नोव्हेंबर २०१४ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत आ़ भालेराव यांनी लिंबोटी प्रकल्पातील पाणी उदगीर शहरासाठी आरक्षित करण्याचा प्रश्न उपस्थित केला असता उदगीर नगरपरिषदेने पाणी आरक्षणाचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पुर्नसादरीकरणाचे आदेश दिले़ शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी अपेक्षित यश मिळत नसल्याने नागरिकांची भटकंती होत आहे़

Web Title: Question on water reservation on the anagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.