छत्रपती संभाजीनगरात भर उन्हात मतदारांच्या रांगा, दुपारी एक वाजेपर्यंत ३२. ३७ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 01:53 PM2024-05-13T13:53:55+5:302024-05-13T13:54:41+5:30

औरंगाबाद मतदार संघातील काही केंद्रांवर ईव्हीएम-व्हीपॅट बिघडल्याने गोंधळ

Queues of voters in Chhatrapati Sambhajinagar in full sun, 32 till one o'clock in the afternoon. 37 percent turnout | छत्रपती संभाजीनगरात भर उन्हात मतदारांच्या रांगा, दुपारी एक वाजेपर्यंत ३२. ३७ टक्के मतदान

छत्रपती संभाजीनगरात भर उन्हात मतदारांच्या रांगा, दुपारी एक वाजेपर्यंत ३२. ३७ टक्के मतदान

छत्रपती संभाजीनगर: औरंगाबाद लोकसभेसाठी आज मतदान होत असून सकाळपासून मतदारांचा उत्साह दिसून आला. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या भर उन्हात रांगा लागलेल्या दिसून आल्या.

दरम्यान, गंगापूरमध्ये तीन बॅलेट युनिट, एक कंट्रोल युनिट आणि एक व्हीव्ही पॅट बदलण्यात आले. तर कन्नडमधे सहा बॅलेट युनिट, दोन कंट्रोल युनिट आणि दोन व्हीव्हीपॅट बदलण्यात आले आहे. शहरी भागात देखील काही ठिकाणी ईव्हीएम बदलण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, यास जिल्हा प्रशासनाने दुजोरा दिला नाही. दुपारी एक वाजेपर्यंत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघांमध्ये ३२.३७ टक्के मतदान झाले.

Web Title: Queues of voters in Chhatrapati Sambhajinagar in full sun, 32 till one o'clock in the afternoon. 37 percent turnout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.