२५ हजार३८६ मतांचा कोटा ठरला; काळेंची आघाडी, विश्वासरावांची मुसंडी तर भाजप तिसऱ्यास्थानी

By सुमेध उघडे | Published: February 2, 2023 03:32 PM2023-02-02T15:32:23+5:302023-02-02T15:34:13+5:30

पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांनी पहिल्या पसंतीच्या जोरावर २० हजार ८७ मते घेत आघाडी घेतली आहे.

Quota of 25 thousand 386 votes was determined; Vikram Kale is leading, Suryakant Vishwasrao's Musandi and BJP's Kiran Patil is third place | २५ हजार३८६ मतांचा कोटा ठरला; काळेंची आघाडी, विश्वासरावांची मुसंडी तर भाजप तिसऱ्यास्थानी

२५ हजार३८६ मतांचा कोटा ठरला; काळेंची आघाडी, विश्वासरावांची मुसंडी तर भाजप तिसऱ्यास्थानी

googlenewsNext

औरंगाबाद:शिक्षक मतदारसंघात जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. विजयासाठी २५ हजार ३८६ मतांचा कोटा ठरला आहे. पहिल्या फेरीची अधिकृत आकडेवारी जाहीर झाली असून यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विक्रम काळे २० हजार ७८ मते घेऊन आघाडी घेतली आहे. दरम्यान, शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांनी अनेपक्षित मुसंडी मारत दुसरे स्थान पटकावले आहे. तर भाजप उमेदवार किरण पाटील तिसऱ्या स्थानावर आहेत.

पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांनी पहिल्या पसंतीच्या जोरावर २० हजार ८७ मते घेत आघाडी घेतली आहे. तर भाजपचे उमेदवार किरण पाटील तिसऱ्या स्थानावर असून त्यांना १३ हजार ४८६ मते मिळाली आहेत. तर मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांनी मुसंडी मारत सर्वाना धक्का दिला आहे. विश्वासराव यांना १३ हजार ५४३ मते मिळाली आहेत. दरम्यान, तब्बल २ हजार ४८५ मते बाद झाली आहेत. अत्यंत चुरासिच्या निवडणुकीत काळे यांना कोटा पूर्ण करण्यासाठी आता केवळ ५ हजार ३०८ मते कमी आहेत. 

चार उमेदवारांना दोन अंकी मते 
१४ उमेदवारांमुळे यंदा निवडणूक बहुरंगी झाली. यात राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपने प्रतिष्ठेची लढाई केली आहे. मात्र, शिक्षक संघाने देखील जोरदार नियोजन केल्याचे मतदानातून दिसून येत आहेत. दरम्यान, चौदा पैकी चार उमेदवारांना पहिल्या फेरीत केवळ दोन अंकी मते मिळाली आहेत. अनिकेत भीमराव वाघचावरे पाटील २२, अश्विनकुमार क्षीरसागर १२, आशिष देखमुख १३, विशाल नांदरकर २८ अशी मते मिळाली आहेत.     

Web Title: Quota of 25 thousand 386 votes was determined; Vikram Kale is leading, Suryakant Vishwasrao's Musandi and BJP's Kiran Patil is third place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.