राजूर-पैठण दिंडी मार्गाचे कामही लवकरच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:32 AM2017-07-30T01:32:18+5:302017-07-30T01:32:18+5:30

जालना / मंठा : वीस वर्षांच्या खासदारकीच्या काळात शेगाव ते पंढरपूर दिंडी मार्गाला न मिळालेली मंजुरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मिळवून दिली. या महामार्गाप्रमाणेच राजूर-पैठण दिंडीमार्गाचे काम होणार असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे केले.

raajauura-paaithana-daindai-maaragaacae-kaamahai-lavakaraca-haonaara | राजूर-पैठण दिंडी मार्गाचे कामही लवकरच होणार

राजूर-पैठण दिंडी मार्गाचे कामही लवकरच होणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना / मंठा : वीस वर्षांच्या खासदारकीच्या काळात शेगाव ते पंढरपूर दिंडी मार्गाला न मिळालेली मंजुरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मिळवून दिली. या महामार्गाप्रमाणेच राजूर-पैठण दिंडीमार्गाचे काम होणार असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे केले.
परतूर तालुक्यातील वाटूरफाटा येथे शनिवारी पभरणी-जालना जिल्हा पॅकेजअंतर्गत अकरा हजार कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांच्या कामांचे भूमीपूजन झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय दळणवळण व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, विधासनभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. संजय जाधव , जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी जि.प. अध्यक्ष राहुल लोणीकर, माजी आ. अरविंद चव्हाण, विलास खरात, परभणीचे माजी आ. विजय गव्हाणे, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक पी. एस. मंडपे, सुरकुटवार, हिमांशू श्रीवास्तव, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील आदींची उपस्थिती होती.
खा. दानवे म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे शेगाव-पंढरपूर राज्यमार्गाचे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात झाले आहे. सिल्लोडहून जाणाºया महामार्गासाठी दोन हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गडकरी यांच्या पुढाकाराने साडेपाचशे कोटींचा ड्रायपोर्ट जालन्यात होत असून, याचा स्थानिक उद्योजकांना मोठा फायदा होणार आहे. मंठा-परतूर प्रमाणेच मराठवाड्यातील इतर ठिकाणी वाटरग्रीड योजना मंजूर करावी. पाणी, रस्ते, वीज, सिंचनासाठी केंद्राकडून या पुढेही भरीव निधी मिळेल, असा विश्वास दानवे व्यक्त केला.
पालकमंत्री लोणीकर म्हणाले, की आतापर्यंतच्या सत्ताधाºयांनी शेगाव-पंढरपूर दिंडी मार्गाच्या कामाकडे दुर्लक्ष केले. परंतु मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या भरीव निधीमुळे मराठवाड्यातील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. जालना, परतूर व मंठा तालुक्यातील १७६ गावांना ग्रीडद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी २३४ कोटी रुपयांचा निधीतून योजना साकारत आहे. याच धर्तीवर संपूर्ण मराठवाड्यातील जनतेला एकाच योजनेतून पाणीपुरवठा करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही लोणीकर म्हणाले.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, की रस्ते विकासामध्ये महाराष्ट्रासह अन्य राज्यात भरीव कामगिरी करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इतिहास घडविला आहे. परळी शहरातून राष्ट्रीय महामार्ग करण्यात आल्याने विकासाला चालना मिळणार आहे. मंत्रीपदाच्या माध्यमातून आपण स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करत असल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर भांदरगे, भाऊसाहेब कदम, सभापती स्मिता मस्के, हरिराम माने, जि.प. सदस्या रोहिणी बोराडे, अ‍ॅड. भूजंगराव गोरे, अंकुश कदम आदींची उपस्थिती होती.

Web Title: raajauura-paaithana-daindai-maaragaacae-kaamahai-lavakaraca-haonaara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.