रेबीज लससाठी रुग्णांंना ‘यातना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:26 AM2018-11-29T00:26:37+5:302018-11-29T00:26:42+5:30

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे होणाºया जखमेच्या वेदनेबरोबर उपचारातील टोलवाटोलवी आणि लसींच्या टंचाईने रुग्णांना यातना भोगाव्या लागत आहेत. घाटीत ‘एआरव्ही’ लसीचा तुटवडा जाणवत आहे. मनपाकडून रुग्णांना ‘एआरएस’ लस दिली जात नाही. त्यामुळे उपचारासाठी आधी घाटी आणि नंतर मनपा रुग्णालय, अशा प्रकारे रुग्णांना चकरा माराव्या लागत आहेत.

Rabies vaccine for patients 'torture' | रेबीज लससाठी रुग्णांंना ‘यातना’

रेबीज लससाठी रुग्णांंना ‘यातना’

googlenewsNext
ठळक मुद्देघाटीत ‘एआरव्ही’ नाही : महापालिका रुग्णांना देत नाही ‘एआरएस’, उपचारासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चकरा

औरंगाबाद : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे होणाºया जखमेच्या वेदनेबरोबर उपचारातील टोलवाटोलवी आणि लसींच्या टंचाईने रुग्णांना यातना भोगाव्या लागत आहेत. घाटीत ‘एआरव्ही’ लसीचा तुटवडा जाणवत आहे. मनपाकडून रुग्णांना ‘एआरएस’ लस दिली जात नाही. त्यामुळे उपचारासाठी आधी घाटी आणि नंतर मनपा रुग्णालय, अशा प्रकारे रुग्णांना चकरा माराव्या लागत आहेत.
पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणाºया जखमेत रेबीजचे विषाणू असतात. रेबीजच्या विषाणूंना तातडीने नियंत्रणात न आणल्यास ते मेंदूपर्यंत जातात आणि रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे रुग्णांना तातडीने अ‍ॅन्टी रेबीज सिरम (एआरएस) देणे आवश्यक असते. त्यानंतर रुग्णांना अ‍ॅन्टी रेबीज व्हॅक्सिन (एआरव्ही) दिली जाते. घाटी रुग्णालयात तब्बल वर्षभरापासून ‘एआरव्ही’ उपलब्ध नाही. लसीसाठीही थेट मेडिकलचा, मनपाचा रस्ता दाखविला जातो. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाºया गोरगरीब रुग्णांची परवड होत आहे. घाटीत गतवर्षी ९ हजार रुग्णांवर उपचार केल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे म्हणाले, मोकाट कुत्र्यांमुळे जखमी होणाºया रुग्णांवर उपचाराची जबाबदारी ही महापालिकेची आहे. त्यांनी केवळ गंभीर रुग्णच घाटीत पाठविले पाहिजे.
४ हजार ५५७ रुग्णांवर उपचार
महापालिकेच्या सिडकोतील एन-८, एन-११, बन्सीलालनगर, सिल्कमिल कॉलनी, कैसर कॉलनीतील रुग्णालयात ‘एआरव्ही’ लस दिली जाते. यावर्षी आतापर्यंत ४ हजार ५५७ रुग्णांना ही लस देण्यात आली आहे. सध्या मनपाकडे ७७९ ‘एआरव्ही’लस उपलब्ध आहेत. तर घाटीला ५०० ‘एआरएस’ लस देण्यात आल्याचे मनपाच्या वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी दररोज २० ते ३० रुग्ण येत असल्याचे सांगितले. परंतु यावर्षी ४१८ रुग्णांवर उपचार केल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली.
गंभीर रु ग्णांनाच लस
घाटीत २०० ‘एआरएस’ लस सध्या उपलब्ध आहे. मात्र, ‘एआरव्ही’ लस उपलब्ध नाही. गंभीर रु ग्णांना तात्काळ रुग्णालयातच लस दिली जाते. परंतु गंभीर जखमी नसलेल्यांना बाहेरून लस घेण्यास सांगितले जाते. यावर्षी आतापर्यंत मोकाट कुत्रा चावलेल्या ४१८ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
- डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक, घाटी
घाटीला ‘एआरएस’चा पुरवठा
महापालिकेच्या पाच रुग्णालयांत ‘एआरव्ही’ लस दिली जाते. महापालिकेकडून ‘एआरएस’ लस दिली जात नाही; परंतु रुग्णांच्या उपचारासाठी महापालिकेकडून घाटीला ‘एआरएस’ लस पुरविल्या जाते.
-डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

Web Title: Rabies vaccine for patients 'torture'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.