औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजपमध्ये राडा; भाजपचे सरचिटणीस केंद्रे यांना शिवसैनिकांची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 02:51 PM2021-07-26T14:51:59+5:302021-07-26T15:01:46+5:30

Shiv sena Vs Bjp : गारखेडा येथील कोरोना लसीकरण केंद्रावर झालेल्या वादाचे पर्वसन मारहाणीत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Rada in Shiv Sena-BJP in Aurangabad; BJP general secretary Pro. Kendre beaten by Shiv Sainiks | औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजपमध्ये राडा; भाजपचे सरचिटणीस केंद्रे यांना शिवसैनिकांची मारहाण

औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजपमध्ये राडा; भाजपचे सरचिटणीस केंद्रे यांना शिवसैनिकांची मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देगुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजपचा पोलीस स्थानकात ठीय्यामारहाण केली नसल्याचा शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांचे स्पष्टीकरण

औरंगाबाद : शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी भाजप चिटणीस प्रा. गोविंद केंद्रे यांना आज दुपारी गारखेडा येथे मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यालयात मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. प्रा. केंद्रे यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गारखेडा येथील कोरोना लसीकरण केंद्रावर झालेल्या वादाचे पर्वसन मारहाणीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत दोन्ही बाजूंनी आरोपप्रत्यारोप करण्यात येत आहेत.  ( BJP general secretary Pro. Kendre beaten by Shiv Sainiks in Aurangabad )  

महापालिका निवडणूका जवळ येत आहेत तसा शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष आता आणखी तीव्र होत असल्याचे चित्र आहे. गारखेड़ा येथील लसीकरण केंद्रावर भाजपचे सरचिटणीस प्रा. गोविंद केंद्रे आणि शिवसेनेचे माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर राजेंद्र जंजाळ यांनी गोविंद केंद्रे यांना गाडीत घालून शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या कार्यालयात नेले. त्या ठिकाणी काही शिवसेनेचे गुंड बोलावून भूमरे यांच्या कार्यालयात मारहाण करण्यात आली. यात प्रा. केंद्रे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यात मंत्री आणि सत्ताधारी नेत्यांनीच गुंडगिरी करण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढत असून औरंगाबादमध्ये ही याची प्रचिती पुन्हा दिसून आली, असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. तर, गारखेडा येथील मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यालयात चहा पिण्यासाठी शिवेसेनेचे राजेंद्र जंजाळ आणि प्रा. गोविंद केंद्रे आणि इतर आले होते. यावेळी प्रा. केंद्रे आणि काही कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यातून एकाने त्यांना खाली पाडले. यानंतर प्रा. केंद्रे यांना जंजाळ यांनी स्वतः उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असे स्पष्टीकरण शिवसेनेने दिले आहे. 

भाजपचे पोलीस स्थानकात ठिय्या 
दरम्यान, राजेंद्र जंजाळ यांच्यावर अपहरण करून मारहाण करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी करत भाजपकडून जवाहर नगर पोलीस स्थानकात ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. 

मी मारहाण केली नाही 
लसीकरण केंद्रावरून प्रा. केंद्रे व इतर चहा पिण्यासाठी सुतगरिणी चौकात आलो होतो. येथे कार्यकर्ते आणि प्रा. केंद्रे यांच्यात वाद झाला. तेथे प्रा. केंद्रे यांना एकाने मारहाण केली, ते खाली पडले. त्यांना मी सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मी मारहाण केलेली नाही.
- राजेंद्र जंजाळ, शिवसेना 

Web Title: Rada in Shiv Sena-BJP in Aurangabad; BJP general secretary Pro. Kendre beaten by Shiv Sainiks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.