राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी राधिका, अश्लेषा यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:12 AM2017-12-31T00:12:42+5:302017-12-31T00:13:21+5:30
बिलासपूर येथे होणाºया ३७ व्या राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेसाठी औरंगाबादच्या राधिका शर्मा आणि अश्लेषा पाटील यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
औरंगाबाद : बिलासपूर येथे होणाºया ३७ व्या राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेसाठी औरंगाबादच्या राधिका शर्मा आणि अश्लेषा पाटील यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. महाराष्ट्राचा संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पुणे येथून नुकताच रवाना झाला आहे. राधिका शर्मा ही ५४ आणि अश्लेषा पाटील ही ४८ किलोखालील वजन गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी औरंगाबादची राष्ट्रीय खेळाडू अंतरा हिरे हिची निवड झाली आहे.
कोल्हापूर येथे झालेल्या राज्य ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत राधिका शर्मा आणि अश्लेषा पाटील यांनी आपापल्या वजन गटात सुवर्णपदक जिंकताना राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात आपली निवड निश्चित केली होती. या निवडीबद्दल औरंगाबाद तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष के. डी. शार्दूल, राज्य संघटनेचे सदस्य नीरज बोरसे, सचिव लता कलवार, अमोल थोरात, संतोष सोनवणे, योगेश विश्वासराव, शरद तिवारी, राजू जाधव, गजेंद्र गवंडर, चंद्रशेखर जेऊरकर, अविनाश नलावडे, डोनिका रूपारेल, आशिष बनकर, धनंजय बागल, प्रतीक जांभूळकर, विशाल सुरडकर, प्रीती खरात यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.