पंधराशे रुपयांची लाच घेतांना रहीमाबादच्या तलाठी अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 07:31 PM2018-12-10T19:31:59+5:302018-12-10T19:33:29+5:30

जमिनीची नोंद फेरफार रजिस्टरमध्ये घेण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच मागितली

Rahibad's Talathi arrested after taking a bribe of Rs fifteen hundred | पंधराशे रुपयांची लाच घेतांना रहीमाबादच्या तलाठी अटकेत 

पंधराशे रुपयांची लाच घेतांना रहीमाबादच्या तलाठी अटकेत 

googlenewsNext

सिल्लोड (औरंगाबाद ) : जमिनीची नोंद फेरफार रजिस्टरमध्ये घेण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच घेतांना तालुक्यातील रहीमाबाद येथील महिला तलाठीस लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले. दिपाली तुकाराम जाधव (30 ) असे आरोपी तलाठीचे नाव असून या कारवाईने तालुक्यातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराने त्यांच्या पत्नीच्या नावावर रहीमाबाद शिवारात जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीचा फेर घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तक्रारदारांनी तलाठ्यांकडे दिले होते. परंतु हे फेर घेण्यासाठी तलाठी महिलेने दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. तड़जोड़ी अंती पंधराशे रूपये देण्याचे ठरले होते. परंतु तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद येथे या प्रकरणी तक्रार दिली. यावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी टिळक नगर येथील तलाठ्यांच्या खाजगी कार्यालयात सापळा रचला. याच ठिकाणी आज दुपारी जाधव यांना लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी,अप्पर पोलिस अधीक्षक शंकर जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक नितिन देशमुख,पोलिस निरीक्षक महादेव ढाकने,पोलिस नाईक भीमराज जीवड़े, अश्वलिंग होनराव, बाळासाहेब राठोड, महिला पोलिस शिपाई नुसरत शेख, संदिप चिंचोले यांनी केली.याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Rahibad's Talathi arrested after taking a bribe of Rs fifteen hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.