‘रहेमत की बारीश अदा फरमा’
By Admin | Published: July 19, 2015 12:27 AM2015-07-19T00:27:10+5:302015-07-19T00:27:10+5:30
बीड : पवित्र रमजान ईद शनिवारी जिल्ह्यात पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट ओढावलेले असल्यामुळे
बीड : पवित्र रमजान ईद शनिवारी जिल्ह्यात पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट ओढावलेले असल्यामुळे मुस्लिम बांधवांनी पावसासाठी अल्लाहकडे ‘रहेमत की बारीश अदा फरमा’ अशी विनवणी केली. वैश्विक शांततेसाठीही दुवा मागितली.
शहरातील किल्ला मैदान जामा मस्जिद, नवीन इदगाह बालेपीर येथे मोठ्या प्रमाणात समाजबांधवांनी नमाज अदा केली. यावेळी काझी फैजद्दुल्ला यांनी मार्गदर्शन केले. मर्कज मस्जिद, इस्लामपुरा इदगाह, दर्गाह मस्जिद बालेपीर, जामा महेबूबिया मस्जिद शाहूनगर, कादरपाशा मस्जिद जुना बाजार, केजीएन मस्जिद शहेंशाहनगर, दर्गाह शहेंशाहवली मस्जिद आदी ठिकाणी नमाज अदा करून दुवा मागण्यात आली.
यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, उपअधीक्षक गणेश गावडे, रा. काँ. जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, माजी आ. राजेंद्र जगताप, शिवसंग्रामचे राजेंद्र मस्के, प्रा. सुशीला मोराळे, बाबूराव दुधाळ, डॉ. योगेश क्षीरसागर, मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, सहायक निरीक्षक एम. ए. सय्यद, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, सुभाषचंद्र सारडा आदींनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आ. सय्यद सलीम, सिराजोद्दीन देशमुख, अॅड. शेख शफीक, खालेक पेंटर, मोईन मास्टर, शेख फारूक, उपनगराध्यक्ष नसीम इनामदार, शेख मुसा, शाहेद पटेल, अॅड. इरफान बागवान आदी उपस्थित होते.
गेवराईतही पावसासाठी दुवा
येथील ईदगाह मैदानावर ईदनिमित्त नमाज अदा करून पाऊस व शांततेसाठी दुवा मागितली. यावेळी मुस्लिम बांधवांची मोठी उपस्थिती होती. आ. अॅड. लक्ष्मण पवार, आ. अमरसिंह पंडित, माजी मंत्री बदामराव पंडित, जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, नगराध्यक्ष महेश दाभाडे, जि. प. सदस्य युधाजित पंडित, उपअधीक्षक राजकुमार चाफेकर, निरीक्षक सुरेंद्र गंधम, नायब तहसीलदार कल्याण जगरवाल, मुख्याधिकारी उमेश ढाकणे, शेख जमादार, याहिया खान, रोहित पंडित, हन्नान इनामदार यांची उपस्थिती होती. उमापूर, चकलांबा, तलवाडा येथेही ईद साजरी करण्यात आली.
धारूर, शिरूर, पाटोदा, परळी, अंबाजोगाई, वडवणी, केज, माजलगाव, आष्टी येथेही ईद उत्साहात साजरी झाली. ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांना सर्व जातीधर्माच्या लोकांनी शुभेच्छा दिल्या.
मुस्लिम बांधवांनी घरोघर गोडधोड पदार्थ, शिरखुर्मा, गुलगुले तयार केले होते. नवीन पोषाख परिधान करून लहानांपासून मोठ्यापर्यंत एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा देत होते. (प्रतिनिधी)