महाराष्ट्राचा राहुल आवारे विश्वस्तरीय पहिलवान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:26 AM2018-07-22T00:26:47+5:302018-07-22T00:28:24+5:30

महाराष्ट्राचा प्रतिभावान मल्ल राहुल आवारे हा विश्वस्तरीय पहिलवान आहे. त्याच्यात प्रचंड गुणवत्ता असून तो २0२0 टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकेल, अशी आशा आॅलिम्पिकपदक विजेते योगेश्वर दत्त याने शनिवारी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. योगेश्वर दत्त औरंगाबादेत एका दुकानाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने औरंगाबादेत शनिवारी आला होता. यावेळी योगेश्वर दत्त याने लोकमतशी विशेष संवाद साधला.

Rahul is a world-class wrestler from Maharashtra | महाराष्ट्राचा राहुल आवारे विश्वस्तरीय पहिलवान

महाराष्ट्राचा राहुल आवारे विश्वस्तरीय पहिलवान

googlenewsNext
ठळक मुद्देआॅलिम्पियन पदकविजेता योगेश्वर दत्तने केली मुक्तकंठाने प्रशंसा : २0२0 टोकियो आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकेल

औरंगाबाद : महाराष्ट्राचा प्रतिभावान मल्ल राहुल आवारे हा विश्वस्तरीय पहिलवान आहे. त्याच्यात प्रचंड गुणवत्ता असून तो २0२0 टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकेल, अशी आशा आॅलिम्पिकपदक विजेते योगेश्वर दत्त याने शनिवारी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
योगेश्वर दत्त औरंगाबादेत एका दुकानाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने औरंगाबादेत शनिवारी आला होता. यावेळी योगेश्वर दत्त याने लोकमतशी विशेष संवाद साधला. खाशाबा जाधव आणि सुशीलकुमार यांच्यानंतर योगेश्वर दत्त याने आॅलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकून देण्याचा भीमपराक्रम केला आहे. प्रतिष्ठित अशा पद्मश्री, अर्जुन आणि खेलरत्न पुरस्काराने सन्मानित योगेश्वर दत्त याने २0१२ मध्ये भारताला लंडन आॅलिम्पिकमध्ये ६0 किलो वजन गटात कास्यपदक जिंकून दिले होते. त्याचप्रमाणे त्याने २0१४ साली इचियोन आशियाई स्पर्धेत ६५ किलो वजन गटात सुवर्ण आणि २0१६ च्या दोहा आशियाई स्पर्धेत ६0 किलो वजन गटात कास्यपदक जिंकले होते. तसेच २0१0 दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने गोल्डन कामगिरी केली होती. त्याचप्रमाणे २00७ मध्ये लंडन येथील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
योगेश्वर दत्त याने महाराष्ट्राचा स्टार पहिलवान राहुल आवारे याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. तो म्हणाला, राहुल आवारे हा जागतिक दर्जाचा पहिलवान आहे. त्याने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे. राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकून विशेष ठसा उमटवला आहे. तंदुरुस्त नसल्यामुळे तो आशियाई स्पर्धेसाठी जाऊ शकला नाही. तथापि, २0२0 मध्ये टोकियो आॅलिम्पिकमध्ये तो भारतासाठी पदक जिंकेल अशी आशा वाटते. गत अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची लयलूट करणाऱ्या राहुल आवारे याने गोलकोस्ट येथे याच वर्षी सुवर्णपदक जिंकले होते; परंतु दुखापतीमुळे तो आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी सहभागी होऊ शकला नव्हता.
आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेविषयीही योगेश्वर दत्तने मत व्यक्त केले. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला असे दोन्ही संघांतील खेळाडू प्रतिभावान आहेत आणि भारत या स्पर्धेत कमीत कमी ८ ते १0 पदके जिंकेल, असा विश्वासही योगेश्वर दत्तने व्यक्त केला. दुखापतीमुळे राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धा खेळू न शकणारा योगेश्वर दत्त आता पुन्हा खेळण्यास सज्ज झाला आहे. आॅक्टोबर महिन्यात होणाºया वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भरीव कामगिरी करून पदक जिंकण्यावर आपला फोकस असल्याचे त्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
प्रो रेसलिंग लीग ही भारतीय पहिलवानांसाठी लाभदायक ठरत असल्याचे योगेश्वर दत्तने सांगितले. तो म्हणाला, ‘‘प्रो रेसलिंगमध्ये जगभरातील दिग्गज पहिलवान सहभागी होत असतात. त्यांच्याबरोबर आणि त्यांच्याविरुद्ध खेळण्याची संधी भारतीय पहिलवानांना प्रो रेसलिंग लीगमुळे मिळत आहे. त्याचा अनुभव भारतीय मल्लांसाठी मोलाचा ठरत आहे. येथील पहिलवानांसाठी प्रो रेसलिंग हे एक चांगले व्यासपीठ आहे.’’

Web Title: Rahul is a world-class wrestler from Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :