लासूर ते पोटूळदरम्यान रेल्वे रुळाचा जोड निखळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:16 PM2019-01-30T23:16:45+5:302019-01-30T23:16:59+5:30
औरंगाबाद : लासूर ते पोटूळ रेल्वेस्टेशनदरम्यान रेल्वे रुळाचा जोड (वेल्डिंग) निखळल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर सहा ...
औरंगाबाद : लासूर ते पोटूळ रेल्वेस्टेशनदरम्यानरेल्वे रुळाचा जोड (वेल्डिंग) निखळल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर सहा रेल्वेगाड्या अगदी धीम्या गतीने रवाना करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने एखादी दुर्घटना होण्याचे टळले.
रेल्वे मार्गात दोन रूळ जोडण्यासाठी वेल्डिंग केली. वेल्डिंग केलेल्या जागेवर ‘नटबोल्ट’द्वारे क्लिपदेखील बसविण्यात येते. थंडीमुळे अनेकदा रेल्वे रुळाला तडा जाण्याचा आणि वेल्ंिडग निखळण्याचा प्रकार होतो. लासूर ते पोटूळदरम्यान रेल्वे रुळाचा जोड निखळल्याची घटना घडली. औरंगाबादहून जनशताब्दी एक्स्प्रेस रवाना झाली. ही रेल्वे लासूर ते पोटूळदरम्यान असताना रेल्वे रुळाची वेल्ंिडग निखळल्याचा प्रकार रेल्वेच्या गार्डच्या लक्षात आला. याविषयी तात्काळ लासूर स्टेशन येथील रेल्वे अधिकाऱ्यांना आणि नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. गँगमन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रुळाची दुरुस्ती होईपर्यंत रेल्वेगाड्या अतिशय संथ गतीने या ठिकाणाहून रवाना करण्यात आल्या.
असा प्रकार अनेकदा होतो. रुळाच्या जोडवर क्लिप असते. त्यामुळे हा प्रकार धोकादायक नसतो. संबंधित ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाºयांनी दिली. रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे दोन दिवसांपासून प्रवाशांकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यातच ही घटना घडली आणि पुन्हा काही रेल्वेगाड्यांची गती मंदावली.