रेल्वे, बसेसही ‘हाऊसफुल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:04 AM2017-12-25T01:04:39+5:302017-12-25T01:04:46+5:30
नाताळ आणि नवीन वर्षाच्या जल्लोषासाठी औरंगाबादकरांची पावले विविध पर्यटन आणि धार्मिक स्थळांकडे वळत आहेत. विविध ठिकाणी जाणाºया रेल्वे आणि बसचे बुकिंग नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर फुल झाले आहेत. रेल्वेस्टेशन आणि बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क

नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गोव्याला जाण्यास प्राधान्य देणाºयांची संख्या मोठी आहे. रेल्वेने मनमाड मार्गे गोव्याला जाण्यास प्राधान्य दिले जाते. रेल्वेस्टेशनवर रविवारी नेहमीपेक्षा प्रवाशांची गर्दी अधिक दिसून आली. प्रवाशांच्या गर्दीने रेल्वे भरून जात होत्या.
सर्वच रेल्वेगाड्यांच्या आगामी काही दिवसांमधील बुकिंग फुल झाली आहे. यामध्ये देवगिरी एक्स्प्रेस २२ जानेवारी, तर अजिंठा एक्स्प्रेस ३१ जानेवारीपर्यंतचे आरक्षण फुल झाल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.