रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना हवे सामाजिक सुरक्षेचे कवच...
By Admin | Published: May 31, 2016 12:11 AM2016-05-31T00:11:28+5:302016-05-31T00:43:39+5:30
औरंगाबाद : रेल्वे कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस काम करूनही पुरेशा सुविधा मिळत नाही. निवासस्थान, आरोग्य, अल्प वेतन अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे
औरंगाबाद : रेल्वे कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस काम करूनही पुरेशा सुविधा मिळत नाही. निवासस्थान, आरोग्य, अल्प वेतन अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात नव्याने जाचक योजना कर्मचाऱ्यांवर थोपविल्या जात आहेत; परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. त्यासाठी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची वेळ येत आहे, असे दक्षिण मध्य रेल्वे कर्मचारी संघाचे विभागीय सचिव यू. वेंकटेश्वरलू म्हणाले.
औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर रविवारी दक्षिण मध्य रेल्वे कर्मचारी संघाची बैठक पार पडली. याप्रसंगी यू. वेंकटेश्वरलू यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. विविध प्रश्नांसंदर्भात ९ जून रोजी रेल्वेला नोटीस देण्यात येणार आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास ११ जुलैपासून संप करण्यात येणार आहे. रेल्वे इंजिनमध्ये ६० डिग्री तापमान असते. तरीही एसी लावण्यास नकार दिला जात आहे. अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या कामानंतर मालगाड्या या मार्गावरून वळविल्या जातील. पॅसेंजर लांब अंतरापर्यंत चालविण्याऐवजी एक्स्प्रेस चालवाव्यात. औरंगाबादहून नव्या रेल्वे सुरू करणे, दुहेरीकरण इ. प्रश्नांसाठी प्रयत्न केला जात आहे. यावेळी कार्तिक सोनुले, एम.श्रीधर, प्रकाश हटकर, धनंजयकुमार सिंग, अशोक निकम, राजेश शिंदे यांची उपस्थिती होती.