इंधन चोरांकडून रेल्वे इंजिन टार्गेट; दुचाकीतून चोरावे इतक्या सहज १,४०० लीटर डिझेल चोरले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 07:58 PM2022-12-15T19:58:37+5:302022-12-15T19:59:07+5:30

दुचाकीतून चोरावे, असे सहज चोरले रेल्वे इंजिनमधून डिझेल

Railway Engines Targeted by Fuel Thieves; They stole 1,400 liters of diesel so easily from a two-wheeler | इंधन चोरांकडून रेल्वे इंजिन टार्गेट; दुचाकीतून चोरावे इतक्या सहज १,४०० लीटर डिझेल चोरले

इंधन चोरांकडून रेल्वे इंजिन टार्गेट; दुचाकीतून चोरावे इतक्या सहज १,४०० लीटर डिझेल चोरले

googlenewsNext

औरंगाबाद : दुचाकीतून काढावे, अशा प्रकारे अगदी सहजपणे लासूर रेल्वे स्थानकावर दिवसांपासून थांबलेल्या रेल्वे इंजिनमधून तब्बल एक हजार ४०० लीटर डिझेल चोरल्याची घटना घडली. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाने ७ जणांना जेरबंद केले. हे सर्व जण लासूर येथील रहिवासी असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या सूत्रांनी दिली.

लासूर स्टेशन येथे रेल्वे इंजिन उभे होते. आरोपींनी त्यातील सुमारे १ हजार ४०० लीटरचे डिझेल काढून गावातच विकल्याची माहिती समोर आली. या घटनेची माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली. या प्रकरणी घटनास्थळाची पाहणी करून गुन्हा दाखल करत, प्रारंभी दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर, एक-एक करीत अशा ७ जणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पहिल्यांदा की नेहमीच डिझेल चोरी?
आरोपींनी रेल्वे इंजिनमधून पहिल्यांदाच डिझेल चोरी केली. यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारे डिझेल चोरी केली आहे, याचा तपास रेल्वे सुरक्षा बलाकडून करण्यात येत आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
रेल्वे स्टेशनवर इंजिनमधून डिझेल चोरी करेपर्यंतही कोणालाही कळले नाही. त्यामुळे या घटनेमुळे ग्रामीण भागातील रेल्वे स्टेशनवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Railway Engines Targeted by Fuel Thieves; They stole 1,400 liters of diesel so easily from a two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.