दौलताबादला रेल्वे मालधक्का; २४ बोगीच्या पीटलाइनचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 08:00 AM2024-12-02T08:00:20+5:302024-12-02T08:01:12+5:30

रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्यात येत असून, यात साताऱ्याच्या दिशेनेही रेल्वे स्टेशनची इमारत उभारण्यात येत आहे. शिवाय मालधक्क्याला लागूनच १६ बोगींची पीटलाइन करण्यात आली आहे.

Railway Maldhaka to Daulatabad; 24 clear the path to the bogey pitline | दौलताबादला रेल्वे मालधक्का; २४ बोगीच्या पीटलाइनचा मार्ग मोकळा

दौलताबादला रेल्वे मालधक्का; २४ बोगीच्या पीटलाइनचा मार्ग मोकळा

छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने रेल्वे स्टेशन येथील मालधक्का दौलताबाद येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. दौलताबाद येथे मालधक्का साकारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली. मालधक्का स्थलांतरित होणार असल्याने छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर २४ बोगींच्या पीटलाइनचा मार्ग मोकळा झाला आहे.

रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्यात येत असून, यात साताऱ्याच्या दिशेनेही रेल्वे स्टेशनची इमारत उभारण्यात येत आहे. शिवाय मालधक्क्याला लागूनच १६ बोगींची पीटलाइन करण्यात आली आहे.

२४ बोगींच्या पीटलाइनसाठी मालधक्का स्थलांतरित करण्याची सूचना केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी केली होती. त्यामुळे रेल्वे स्टेशनवरील मालधक्का इतरत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी अनेक दिवस जागेचा शोध घेण्यात आला होता.

येथे काय येते, जाते?

येथे देशभरातून सिमेंट, तांदूळ, गहू यासह युरिया आणि इतर मालाची आवक होत असते.

ट्रॅक्टरही मालधक्क्यावर उतरविण्यात येतात.

विविध ठिकाणांहून माल येथून देशातील विविध भागांत पाठविण्यात येतो.

दौलताबाद स्टेशन येथे काय काय होणार?

गुड्स साइडिंग लाइन.

प्लॅटफाॅर्मचे बांधकाम.

हमाल आणि व्यापारी खोल्या.

ट्रॅक टाकणे आणि जोडणे.

कामाचा कालावधी  - १८ महिने.

Web Title: Railway Maldhaka to Daulatabad; 24 clear the path to the bogey pitline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.