रेल्वे प्रवाशांची उडाली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 01:12 AM2017-08-30T01:12:23+5:302017-08-30T01:12:23+5:30

नागपूर- मुंबई दुरोंतो एक्स्प्रेस आसनगाव- वासिनाड स्टेशनदरम्यान घसरल्याच्या घटनेमुळे मंगळवारी (दि.२९) मुंबईहून औरंगाबादमार्गे धावणाºया तीन रेल्वे रद्द झाल्या, तर काही रेल्वे उशिराने धावल्या. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली.

 Railway passengers flown out | रेल्वे प्रवाशांची उडाली तारांबळ

रेल्वे प्रवाशांची उडाली तारांबळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नागपूर- मुंबई दुरोंतो एक्स्प्रेस आसनगाव- वासिनाड स्टेशनदरम्यान घसरल्याच्या घटनेमुळे मंगळवारी (दि.२९) मुंबईहून औरंगाबादमार्गे धावणाºया तीन रेल्वे रद्द झाल्या, तर काही रेल्वे उशिराने धावल्या. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली.
दादर-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस आणि मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस या तीन रेल्वे रद्द करण्यात आल्या, तर नांदेड- मुंबई तपोवन एक्स्प्रेस औरंगाबादपर्यंतच धावली. मुंबई- नांदेड तपोवन एक्स्प्रेस दौंडमार्गे धावली. जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेसला ठिकठिकाणी थांबा घ्यावा लागला. त्यामुळे या रेल्वेच्या वेळेवरही परिणाम झाल्याचे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.
दररोज मुंबईला ये-जा करणाºया प्रवाशांची संख्या मोठी आहे. या रेल्वेंच्या नियमित वेळेत प्रवासी स्टेशनवर दाखल झाले होते; परंतु रेल्वे रद्द झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यावर माघारी फिरण्याची वेळ आली. मुंबईहून येणारी तपोवन एक्स्प्रेस उशिराने धावल्याने प्रवाशांना रेल्वेस्टेशनवर ताटकळावे लागले.

Web Title:  Railway passengers flown out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.