रेल्वेस्टेशन, विमानतळावर २१४ प्रवाशांची तपासणी, १ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:04 AM2020-12-31T04:04:26+5:302020-12-31T04:04:26+5:30
दिवसभरात १ हजार नागरिकांची तपासणी औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी दिवसभरात १ हजार ५ नागरिकांची कोरोना तपासणी केली. ...
दिवसभरात १ हजार नागरिकांची तपासणी
औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी दिवसभरात १ हजार ५ नागरिकांची कोरोना तपासणी केली. १८२ संशयित रुग्णांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये १७ नागरिक पॉझिटिव्ह आढळले. ८२३ नागरिकांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. त्यांचा अहवाल उद्या सकाळी महापालिकेला प्राप्त होईल.
संध्याकाळी बाजारपेठेतील कचरा उचलणे बंद
औरंगाबाद : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या रेड्डी कंपनीने काही महिन्यांपूर्वी सायंकाळी ६ वाजेनंतर बाजारपेठेतील कचरा जमा करण्याचे काम सुरू केले होते. कोरोनामुळे ही सेवा बंद पडली होती. रेड्डी कंपनीने बाजारपेठेतील कचरा उचलण्याचे काम बंद केले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर कचरा जमा करून ठेवल्यास महापालिकेकडून दंड लावण्यात येत आहे.
सिद्धार्थ उद्यान सुरू करण्याचा निर्णय प्रलंबित
औरंगाबाद : राज्य शासनाने राज्यातील सर्व पर्यटनस्थळे सुरू करण्याची परवानगी दिली. शहरातील सिद्धार्थ उद्यान सुरू करण्याचा मनोदय मनपा प्रशासनाने व्यक्त केला होता. मात्र, नंतर हा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. प्राणीसंग्रहालय सुरू करण्यासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने नकार दिला. बच्चेकंपनीच्या मनोरंजनासाठी किमान सिद्धार्थ उद्यान तरी सुरू करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.