रेल्वेस्टेशन रामभरोसे

By Admin | Published: May 24, 2016 01:01 AM2016-05-24T01:01:33+5:302016-05-24T01:26:17+5:30

संतोष हिरेमठ , औरंगाबाद ऐतिहासिक औरंगाबाद आधीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवरील शहर आहे. अशा परिस्थितीत औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनवर रविवारी रात्री स्फोटासाठी

Railway Station Ram Bharos | रेल्वेस्टेशन रामभरोसे

रेल्वेस्टेशन रामभरोसे

googlenewsNext


संतोष हिरेमठ , औरंगाबाद
ऐतिहासिक औरंगाबाद आधीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवरील शहर आहे. अशा परिस्थितीत औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनवर रविवारी रात्री स्फोटासाठी वापरण्यात येणारे डिटोनेटर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. परंतु या घटनेनंतरही रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उदासीन आहे. कोणत्याही तपासणीशिवाय काहीही रेल्वेस्टेशनमधून बिनधास्त नेता येते. रेल्वेस्टेशनवरील सुरक्षा व्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून दिसून आले आहे.
देशभरातील मॉडेल रेल्वेस्टेशनमध्ये औरंगाबाद रेल्वेस्टेशनचा समावेश आहे. पर्यटनाची राजधानी असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात पर्यटक, प्रवाशांची ये-जा सुरू असते. नोकरी, व्यवसायानिमित्त रोज अप-डाऊन करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. सध्या उन्हाळी सुट्या असल्यामुळे रेल्वेगाड्या प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरून जात आहेत. रेल्वेस्टेशनवर पाय ठेवायलाही जागा नाही.
रेल्वेस्टेशनवरून दररोज २५ हजारांवर प्रवासी ये-जा करतात. रेल्वेस्टेशनवर प्रवाशांची कायम गर्दी असताना त्यांचा प्रवास सुरक्षित होईल, याकडे मात्र रेल्वे प्रशासन कानाडोळा करीत आहे. ‘रेल्वे प्रवासादरम्यान ज्वालाग्रही पदार्थ नेऊ नये’ अशी सूचना केली जाते; परंतु केवळ सूचना देऊन रेल्वे प्रशासन मोकळे होत आहे. धोकादायक वस्तूंची रेल्वेस्टेशनवर आणि रेल्वेगाड्यांमधून वाहतूक होणार नाही, यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा नाही. त्यामुळे रेल्वेस्टेशनची सुरक्षा व्यवस्था तोडकी असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात येत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून दिसून आले आहे.
मेटल डिटेक्टर टाळून ये-जा
नव्या इमारतीत मेटल डिटेक्टर असूनही प्रवासी त्यातूनच जाईल, अशी कोणतीही व्यवस्था नाही. मेटल डिटेक्टर लावण्यात आल्यानंतर उर्वरित भाग बंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी याठिकाणी (पान २ वर)
औरंगाबाद : अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या औरंगाबाद शहरातील मुख्य रेल्वेस्टेशनवर रविवारी स्फोटके आढळले होते. या घटनेने संपूर्ण पोलीस यंत्रणा हादरली आहे. शहर पोलिसांसोबतच, दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस), गुप्तवार्ता विभागाकडून (एसआयडी) या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला आहे. या घटनेला २४ तास उलट्यानंतरही याप्रकरणी कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाही.
अत्यंत संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादेतील रेल्वेस्टेशनवर रविवारी रात्री एका भीक मागणाऱ्या दहावर्षीय बालकाकडे एक डिटोनेटर आढळले (पान २ वर)
शहर आणि ग्रामीण भागात परवानाधारक स्फोटकांचे विक्रेते आहेत. विहीर, खदान खोदण्यासाठी डिटोनेटर्स, जिलेटिनचा वापर केला जातो. परवानाधारकांनाच अशी स्फोटके हाताळण्यास आणि बाळगण्यास परवानगी आहे. शिवाय स्फोटकांची ने-आण रेल्वे, एस.टी.बसमधून करता येत नाही, असे असताना रेल्वेस्टेशनवर आढळलेल्या स्फोटकांमुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे परवानाधारकांनी कोणा-कोणाला स्फोटकांची विक्री केली, याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले की, रेल्वेस्टेशनवर आढळलेल्या स्फोटकांची माहिती आम्ही एटीएस आणि ग्रामीण पोलीस विभाग यांना दिलेली आहे. शहर आणि ग्रामीण भागात स्फोटके बाळगणारे परवानाधारक लोक आहे. त्यांचीही चौकशी केली जात आहेत. या घटनेत प्रथमदर्शनी घातपाताचा प्रकार वाटत नसला तरी आम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही.

Web Title: Railway Station Ram Bharos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.