‘आयटीडीसी’ तर्फे रेल्वेस्टेशनची पाहणी

By Admin | Published: September 18, 2016 01:55 AM2016-09-18T01:55:46+5:302016-09-18T01:59:34+5:30

औरंगाबाद : देश-विदेशातील पर्यटकांना केंद्रबिंदू मानून औरंगाबाद रेल्वेस्टेशनचा विकास केला जाणार आहे.

Railway Station survey by 'ITDC' | ‘आयटीडीसी’ तर्फे रेल्वेस्टेशनची पाहणी

‘आयटीडीसी’ तर्फे रेल्वेस्टेशनची पाहणी

googlenewsNext

औरंगाबाद : देश-विदेशातील पर्यटकांना केंद्रबिंदू मानून औरंगाबाद रेल्वेस्टेशनचा विकास केला जाणार आहे. त्यादृष्टीने रेल्वे अधिकाऱ्यांसह इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (आयटीडीसी) अधिकाऱ्यांनी गुरुवारी रेल्वेस्टेशनची पाहणी केली.
औरंगाबाद रेल्वेस्टेशनचा मॉडेल रेल्वेस्टेशनमध्ये समावेश झाला आणि पहिल्या टप्प्यात नव्या इमारतीचे काम झाले. दुसऱ्या टप्प्यातील काम कधी सुरू होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सहकार्याने हे काम केले जाणार आहे. यामध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध सोयी-सुविधा देण्यात येणार आहेत. यासाठी दुसऱ्या टप्प्यात ‘आयटीडीसी’सुमारे ५ कोटी रुपये खर्च करणार आहे. अद्ययावत सोयी-सुविधांबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रेल्वेस्टेशनची उभारणी केली जाणार आहे. यासाठी कामाचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले. या पार्श्वभूमीवर गुरुवारी ‘आयटीडीसी’च्या अधिकाऱ्यांनी रेल्वेस्टेशनची पाहणी करून सोयी-सुविधांचा आढावा घेतला.

Web Title: Railway Station survey by 'ITDC'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.