येरे...येरे...पावसा! राज्यात धो-धो....मराठवाड्यात मात्र पावसाचा ‘खो-खो’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 01:14 PM2024-07-26T13:14:47+5:302024-07-26T13:34:58+5:30

पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस न झाल्यामुळे ७४९ लहान, ११ मोठे व मध्यम ७५ मिळून ८७७ प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत.

rain rain come again! heavy rainfally in the state, but waiting in Marathawada region | येरे...येरे...पावसा! राज्यात धो-धो....मराठवाड्यात मात्र पावसाचा ‘खो-खो’

येरे...येरे...पावसा! राज्यात धो-धो....मराठवाड्यात मात्र पावसाचा ‘खो-खो’

छत्रपती संभाजीनगर : पाऊस राज्यात धो-धो बरसत असला, तरी मराठवाड्याला मात्र पावसाने ‘खो’ दिला आहे. विभागातील आठ जिल्ह्यांत आजवर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५५ दिवसांत ५५.९ टक्के पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरी ६७९.५ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत आजवर ३८०.१ मिमी पाऊस विभागात झाला आहे. परंतु, पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस न झाल्यामुळे ७४९ लहान, ११ मोठे व मध्यम ७५ मिळून ८७७ प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत.

विभागात ५५.९ टक्के पाऊस सध्या झाल्याचे आकडे सांगत आहेत; परंतु वस्तुस्थिती पाहिली तर हा पाऊस पेरण्यांसाठी पूरक आणि धरणे भरण्याच्या दृष्टीने अपुरा आहे. गोदावरी नदीसह ११ नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने नद्या प्रवाही झालेल्या नाहीत. परिणामी, प्रकल्प अद्यापही तळालाच आहेत. पावसाळ्याचे दोन महिने सरत आले असून, उर्वरित काळात पावसाने दडी मारली तर आगामी काळात पाणीटंचाईचा प्रश्न उभा राहणार आहे. मराठवाड्यात २४ जुलै रोजी सकाळपर्यंत १९.९ मि.मी. पाऊस झाला. यात लातूर जिल्ह्यात ३१.५ मि.मी., नांदेड जिल्ह्यात २८ मि.मी. पावसाची नोंद झाली. उर्वरित जिल्ह्यांत १ ते २० मि.मी. दरम्यान पावसाची नोंद झाली.

जिल्हानिहाय आतापर्यंत झालेला पाऊस
छत्रपती संभाजीनगर ५९.२ टक्के
जालना ५७.४ टक्के
बीड ६६.८ टक्के
लातूर ६१.२ टक्के
धाराशिव ६५.५ टक्के
नांदेड ४९.२ टक्के
परभणी ४८.७ टक्के
हिंगोली ४७.०० टक्के
एकूण : ५५.९ टक्के

पाऊस आणि पेरण्याची स्थिती
मराठवाड्यात किती पाऊस? : ५५.९ टक्के
वार्षिक सरासरी : ६७९.५ मिमी
जूनपासून आजवर पाऊस : ३८०.१ मि.मी
२४ जुलै रोजी सकाळपर्यंत पाऊस : १९.९ मिमी
जुलै महिन्यात पाऊस १९६.८ मिमी
पेरण्या किती : ९८ टक्के
११ मोठ्या प्रकल्पांत जलसाठा: १७.३५ टक्के

Web Title: rain rain come again! heavy rainfally in the state, but waiting in Marathawada region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.