ये..रे...ये...रे पावसा! मराठवाड्यात पाऊस बरसतोय, पण प्रकल्पात पाणी येईना
By विकास राऊत | Published: June 18, 2024 07:48 PM2024-06-18T19:48:51+5:302024-06-18T19:50:15+5:30
वार्षिक सरासरी ६७८च्या तुलनेत १३५ मि.मी. पडला
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पाऊस बरसत असला तरी मोठ्या, लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा होत नसल्यामुळे पाणीटंचाईचे सावट अद्याप कायम आहे. विभागाच्या वार्षिक ६७८ मि.मी. सरासरीच्या तुलनेत आजवर १३५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यांत किमान १७० मि.मी. पाऊस होणे अपेक्षित आहे.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दि. १७ जून रोजी सकाळपर्यंत गेल्या २४ तासांत १३.१ मि.मी पाऊस झाला. यात बीड, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याचे पर्जन्यमापक आकडे सांगत आहेत.
मोठ्या धरणांत किती टक्के पाणी......
जायकवाडी ५.३८ टक्के
निम्न दुधना ०.५९ टक्के
येलदरी २७.१७ टक्के
सिद्धेश्वर.....०० टक्के
माजलगाव...०० टक्के
मांजरा....०० टक्के
पेनगंगा...२७.७२ टक्के
मानार...-२२.२२ टक्के
निम्न तेरणा...१३.२५ टक्के
विष्णुपुरी...१३.६५ टक्के
सिना कोळेगाव...०० टक्के
एकूण.............११.५९ टक्के
मराठवाड्याला यलो अलर्ट ....
मराठवाड्यात हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. विभागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
या अलर्टचा अर्थ काय?
रेड अलर्ट.....मुसळधार पाऊस होणार असल्यास रेड अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात येतो. यात पुरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.
यलो अलर्ट ....वातावरणात बदल होणार असल्याचे यलो अलर्टद्वारे सांगण्यात येते. बाहेर पडण्यापूर्वी नागरिकांनी वातावरणाची खातरजमा करण्याचे संकेत यातून मिळतात.
ऑरेंज अलर्ट....या अलर्टमध्ये तुफान पाऊस होण्याचे संकेत देण्यात येतात. नागरिकांनी बाहेर पडताना सर्वतोपरी काळजी घेण्याची सूचना यातून करण्यात येते.
पावसाने का घेतला ब्रेक ....
राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून, सर्व भागांत कमी-अधिक पाऊस होत आहे. मात्र, मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. कोकणातील वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळे पावसाने ब्रेक घेतला आहे. तापमान वाढत असून, हवेतील आर्द्रता ६० टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे वातावरण दमट झाले असून, जनसामान्य घामाघूम होत आहेत.
विभागात आजवर झालेला पाऊस
जिल्हा .........................पाऊस
छत्रपती संभाजीनगर........१५४ मि.मी
जालना ..... १५८ मि.मी.
बीड............ १५१ मि.मी.
लातूर.......... १८० मि.मी.
धाराशिव.......... १७९ मि.मी.
नांदेड......... ६८ मि.मी.
परभणी............ १२० मि.मी
हिंगोली............ ८३ मि.मी
एकूण................ १३५ मि.मी.