पाऊस लांबला; मराठवाड्यावर दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 11:45 AM2021-07-06T11:45:45+5:302021-07-06T11:56:47+5:30
Rain Delay in Marathwada : शेतकऱ्यांनी विभागीय प्रशासनातील वरिष्ठांची भेट घेऊन पेरणी आणि पाऊस याबाबत चिंता व्यक्त केली.
औरंगाबाद : मराठवाड्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले आहे. जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातूर असून, येणाऱ्या आठवड्यात पावसाचे आगमन न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. ( Crisis of double sowing in Marathwada)
औरंगाबाद जिल्ह्यात ६३ टक्के, जालन्यात ७६ टक्के, बीड जिल्ह्यात ८६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. लातूर जिल्ह्यात ५९ टक्के, उस्मानाबाद ६२ टक्के, नांदेड ७६ टक्के, परभणी ६३ टक्के, हिंगोलीत ७१ टक्के पेरण्या आजवर झाल्या आहेत. ६५ टक्क्यांच्या आसपास मराठवाड्यात पेरण्या झाल्याची प्राथमिक आकडेवारी सांगते.
सोमवारी शेतकऱ्यांनी विभागीय प्रशासनातील वरिष्ठांची भेट घेऊन पेरणी आणि पाऊस याबाबत चिंता व्यक्त केली. सध्या पावसाचा खंड असला तरी जुलै महिन्यात पावसाचा चांगला अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली नाही तर विभागातील परिस्थिती पाहता दुबार पेरणी करावी लागेल, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
एवढ्या खर्चात दोन रडार राज्यात बसविणे शक्य होते.https://t.co/DIFm1lqHR2
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) July 5, 2021
यंदाच्या जूनमध्ये २०० मि. मी. पाऊस
यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यात मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. विभागात यंदाच्या जून महिन्यात फक्त आठ दिवस पाऊस झाला आहे. २०० मिलिमीटर पावसाची नोंद विभागात नोंदविली गेली असली तरी अनेक जिल्ह्यांत जून महिन्याची सरासरीदेखील पूर्ण झालेली नाही.