दसºयाला पुन्हा पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:44 AM2017-09-27T00:44:14+5:302017-09-27T00:44:14+5:30

यंदा आधीच दसरा महोत्सव विलंबाने सुरू झाल्याने बोंब होत असतानाच मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. रात्र साडेसात वाजेपर्यंत झालेल्या या पावसामुळे शहरातील रस्तेही जलमय झाले. तर दसरा महोत्सव मैदानावरही पाणी साचल्याने प्रेक्षकसंख्या रोडावली होती.

Rainfall again ten degrees | दसºयाला पुन्हा पावसाचा फटका

दसºयाला पुन्हा पावसाचा फटका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : यंदा आधीच दसरा महोत्सव विलंबाने सुरू झाल्याने बोंब होत असतानाच मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. रात्र साडेसात वाजेपर्यंत झालेल्या या पावसामुळे शहरातील रस्तेही जलमय झाले. तर दसरा महोत्सव मैदानावरही पाणी साचल्याने प्रेक्षकसंख्या रोडावली होती.
दसरा महोत्सवातील विक्रेत्यांना यंदा सुरुवातीपासून शुक्लकाष्ठ लागले. प्रदर्शनाचे काम विलंबाने सुरू झाले. त्यानंतर झोक्याचा ई-लिलाव झाला नाही. ऐनवेळी कमी दराने झोके विनंती करून मागविले तर ते सुरू करण्यास विलंब झाला. झोकेच नसल्याने शनिवार व रविवार सुटीचे दिवस असूनही प्रदर्शनाकडे नागरिकांनी पाठ फिरविली होती. सोमवारी कशीतरी गर्दी जमत असतानाच मंगळवारी पुन्हा पावसाने प्रदर्शनीच्या आनंदावर विरजण घातले. सहा वाजता सुरू झालेल्या पावसाचा जोर पावणेसातच्या सुमारास अचानक वाढला. त्यामुळे प्रदर्शनीतील विक्रेत्यांचा आणखी एक दिवस असाच वाया गेला. दसरा महोत्सवातील विक्रेत्यांचीही तारांबळ उडाली होती. जागोजाग पाणी टपकत असल्याने साहित्याची जुळवाजुळव करण्यातच वेळ घालवावा लागला. तर बाहेरही पाणी साचल्याने चिखल झाला होता.
दुर्गा मंडळाकडे येणाºया भाविकांचीही गर्दी रोडावली होती. तर सिटी क्लब मैदानावरील दांडियाही रद्द करावा लागला. एवढेच नव्हे, तर जि.प.मैदानावर कुलस्वामिनी दुर्गा मंडळातर्फे आयोजित मानसी नाईक यांच्या नृत्याच्या कार्यक्रमालाही याचा फटका बसला. मात्र तुफान गर्दी झाल्याने ८.३0 च्या सुमारास उद्घाटन केले.
शहरातील इतर कार्यक्रमांना पावसाचा फटका बसला असला तरीही आॅर्केस्ट्राला मात्र एकच गर्दी उसळली होती. या मैदानावरही चिखल असला तरीही तरुणाई जोषात असल्याचे चित्र पहायला मिळत होते. तर महिलांचीही या कार्यक्रमास मोठी गर्दी झाली होती.

Web Title: Rainfall again ten degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.