वर्षाव : निवेदनांचा अन्् दगडांचाही
By Admin | Published: October 5, 2016 01:12 AM2016-10-05T01:12:28+5:302016-10-05T01:18:34+5:30
औरंगाबाद : आठ वर्षांनंतर शहरात मंगळवारी पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीच्या निमित्ताने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातील संस्था,
औरंगाबाद : आठ वर्षांनंतर शहरात मंगळवारी पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीच्या निमित्ताने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातील संस्था, संघटना आणि व्यक्तींनी मोर्चे व निवेदनांच्या माध्यमातून मायबाप सरकारपुढे आपल्या मागण्या मांडल्या. दुपारपर्यंत सर्व काही शांततेत सुरू होते. रिमझिम पावसात सुभेदारीत मंत्रिमंडळावर निवेदनांचा ‘वर्षाव’ सुरू होता. त्याचवेळी शेवटच्या क्षणी बाहेर अचानक कायम विनाअनुदानित शिक्षकांच्या मोर्चाला हिंसक वळण लागले. आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी शिक्षकांवर लाठीहल्ला केला. यामुळे संतापलेल्या शिक्षकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली अन् निवेदनांबरोबरच दगडांच्या वर्षावात औरंगाबादेतील मंत्रिमंडळाची बैठक आटोपली....
शहरात आठ वर्षांनंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर मंगळवारी मोर्चे आणि निवेदनांचा अक्षरश: पाऊस पडला. शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी यांच्यासह विविध संघटनांचे तब्बल २१ मोर्चे मंत्रिमंडळाच्या बैठकीवर येऊन धडकले. याशिवाय मराठवाड्यातील विविध भागातून आलेले सुमारे अडीचशे शिष्टमंडळांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन मंत्र्यांना सादर केले. निवेदन देण्यासाठी सुभेदारी विश्रामगृहावर झुंबड उडाली
होती.
राज्य सरकारच्या वतीने महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी निवेदने स्वीकारली. मोर्चांना बैठक स्थळापासून दूर आमखास मैदान येथे रोखण्यात आले होते. तेथून पुढे केवळ शिष्टमंडळांनाच प्रवेश देण्यात येत होता. सुभेदारी विश्रामगृहावर निवेदन स्वीकारण्याचे काम सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होते.
अतिवृष्टीग्रस्तांना मोठा दिलासा देणार
४दहा हजार कोटींच्या सिंचन योजना मंजूर होणार
४औरंगाबाद स्मार्ट सिटीसाठी एक हजार कोटी रु. मिळणार
४डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लोकनेते गोपीनाथ मुंडे ग्रामविकास संस्थेला अर्थसहाय्य मिळणार
४औरंगाबादच्या कॅन्सर हॉस्पिटलला राज्यस्तरीय संस्थेचा दर्जा मिळणार
४डीएमआयसीत नवे उद्योग येणार
४औरंगाबादला जलसंधारण आयुक्तालय स्थापन होणार
लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या खुल्या पत्रातील अनेक मुद्यांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेतलेली दिसते. या पत्राची आज चर्चा होती.
जिल्हा निर्मिती व विभागीय आयुक्तालयासारखे स्फोटक विषय बाजूला ठेवणार
४मराठवाड्यात व्यापक वृक्षलागवडीसाठी इको बटालियनची स्थापना करणार
४औरंगाबाद शहर हे युनेस्कोकडून जागतिक वारसा जाहीर व्हावे यासाठी आवश्यक कारवाईचा प्रस्ताव मंजूर करणार
४जालना येथे सीड पार्क उभारणार
४औरंगाबादेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारणार
४मराठवाडा वाटर ग्रीड योजना जाहीर करणार
४रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना आर्थिक तरतूद करणार
स.सो. खंडाळकर ल्ल औरंगाबाद
बहुचर्चित राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज औरंगाबादेत झाली. तब्बल नऊ वर्षांनंतर अशी बैठक झाल्याने या बैठकीतील निर्णयांकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागून राहिलेले होते. लोकमतने मात्र अशी बैठक व्हावी इथपासून बैठकीत कोणते कोणते निर्णय घेतले जातील, याची गेली काही दिवस परिश्रमपूर्वक मांडणी करून चर्चा घडवून आणली होती.