चिंचोली लिंबाजी परिसरात पावसाचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:05 AM2021-09-22T04:05:32+5:302021-09-22T04:05:32+5:30
१ सप्टेंबरपासून चिंचोली लिंबाजीसह परिसरात सतत पाऊस पडत आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेपासून मुसळधार पावसास सुरुवात झाली. दोन तास ...
१ सप्टेंबरपासून चिंचोली लिंबाजीसह परिसरात सतत पाऊस पडत आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेपासून मुसळधार पावसास सुरुवात झाली. दोन तास पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. नदी, नाल्यांना पूर आल्याने या भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्या २५ वर्षांत न झालेला पाऊस या वीस दिवसांत झाला आहे. आतापर्यंत चिंचोली लिंबाजी महसूल मंडलात रेकॉर्डब्रेक १००९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामुळे खरीप पिकांची पुरती वाट लागली आहे. प्रशासनाने नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तात्काळ आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
फोटो : घाटशेंद्रा येथे लोणी नाल्याचे पुराचे पाणी गावात घुसल्याने राममंदिराला असा पाण्याचा वेढा पडला होता.
210921\screenshot_20210921-184734_whatsapp.jpg
घाटशेंद्रा (ता.कन्नड) येथे लोणी नाल्याचे पाणी गावात घुसल्याने पाण्याने रामंदिराला असा पाण्याचा वेढा पडला होता