औरंगाबाद जिल्ह्यातून पाऊस गायब; खरीप पिकांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:42 AM2018-09-10T00:42:11+5:302018-09-10T00:42:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातून पाऊस गेल्या १५ दिवसांपासून गायब झाला असून, खरीप पिके हातातून जाण्याचा धोका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातून पाऊस गेल्या १५ दिवसांपासून गायब झाला असून, खरीप पिके हातातून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाअभावी पुन्हा एकदा जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद झाली आहे.
पावसाळा संपण्यास अवघा दीड महिन्याचा कालावधी उरला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ सरासरी ५० टक्के पाऊस झाला. त्यात आणखी काही दिवस पाऊस दडी मारणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गतवर्षी ९ सप्टेंबरपर्यंत ३९४.९१ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा केवळ ३४४.१२ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात अत्यल्प पाऊ स झाल्यामुळे तलाव, नदी, नाले क ोरडेठाक पडले आहेत.
गत महिन्यात १५ आॅगस्टनंतर झालेल्या पावसाने पिक ांना दिलासा मिळाला होता. मात्र, पुन्हा वरु णराजा रु सल्यामुळे जिल्ह्यातील पिकांवर संकट आले आहे. विहिरींच्या पाणीपातळीत घट झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कमी पाऊस खुलताबाद तालुक्यात झाला आहे. पोळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतक ऱ्यांवर हंडाभर पाणी घेऊ न सर्जा-राजाची खांदेमळणी क रण्याची वेळ आली.
जायकवाडीत गतवर्षीपेक्षा निम्मा पाणीसाठा
जायकवाडी धरणातील पाणीसाठा यंदा चिंतादायक ठरणार आहे. पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही धरणात गतवर्षीपेक्षा निम्मा पाणीसाठा आहे. आजघडीला केवळ ४६ टक्के पाणीसाठा आहे.
गतवर्षी ९ सप्टेंबर रोजी जायकवाडीत ८२ टक्के पाणीसाठा होता. यंदा पाणीसाठा हा ५० टक्क्यांखालीच आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. धरणाच्या लाभक्षेत्रातही पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे आगामी दीड महिन्यात धरण भरणार की नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे.
आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभीच नाशिक जिल्ह्यातील पावसाने गोदावरी दुथडी भरून वाहिली आणि जायकवाडीतील पाणीसाठ्यात वाढ होण्यास हातभार लागला होता. जायकवाडीच्या वरील धरणांमध्ये पुरेसा साठा झाल्यानंतर जायकवाडीत पाणी येण्याची शक्यता असते. लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही, असे म्हणून वरच्या धरणातून पाणी सोडण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.
दैनंदिन वापराने घट
१ आॅगस्ट रोजी पाणीसाठा 32.25 टक्के होता. त्यानंतर १५ आॅगस्टनंतर धरणाच्या लाभक्षेत्रात झालेल्या पावसाने पाणीपातळीत वाढ झाली; परंतु अवघ्या काही दिवसांत पाण्याची आवकही थांबली आहे. पाणीसाठ्यात १ सप्टेंबरपासून किंचितही वाढ झालेली नाही. औरंगाबादसह विविध पाणी योजनांसाठी जायकवाडीतून पाणी सोडण्यात येते. धरणात आवक थांबलेली असताना दैनंदिन पाण्याचा वापर सुरूच आहे. त्यामुळे पाणीपातळीत घट होत आहे.