‘समृद्धी’च्या मोजणीवर आक्षेपांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:34 AM2017-08-02T00:34:27+5:302017-08-02T00:34:27+5:30

३५० शेतकºयांनी संयुक्त मोजणीबाबत एमएसआरडीसीच्या शिबीर कार्यालयात लेखी आक्षेप दाखल केले आहेत.

Rainfall of objections to 'Samrudhi' counting | ‘समृद्धी’च्या मोजणीवर आक्षेपांचा पाऊस

‘समृद्धी’च्या मोजणीवर आक्षेपांचा पाऊस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग जिल्ह्यातील ज्या गावांमधून जाणार आहे, तेथील जमिनीच्या संयुक्त मोजणीचे काम प्रशासनाने पूर्ण केले आहे. मात्र, यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे बाधित शेतकºयांचे म्हणणे आहे. ३५० शेतकºयांनी संयुक्त मोजणीबाबत एमएसआरडीसीच्या शिबीर कार्यालयात लेखी आक्षेप दाखल केले आहेत.
समृद्धी महामार्गासाठी जालना व बदनापूर तालुक्यातील २५ गावांमधील ५१२ हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. संपादित केल्या जाणाºया जमिनीच्या संयुक्त मोजणीचे काम प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, या मोजणीमध्ये अनेक त्रुटी असल्याच्या बहुतांश शेतकºयांच्या तक्रारी आहेत. अनेक शेतकºयांच्या समृद्धी महामार्गात जाणाºया पाइपलाइन, झाडे, जनावरांचे गोठे, विहिरी, ठिबक सिंचन, शेततळे, कुपनलिका, द्राक्षबाग याच्या नोंदी संयुक्त मोजणीत दाखविण्यात आलेल्या नाहीत. काही गावांमध्ये बागायती जमीन कोरडवाहू दाखविण्यात आली आहे. त्यामुळे बाधित शेतकºयांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या संदर्भात तब्बल ३५० शेतकºयांनी रस्ते विकास महामंडळाच्या येथील शिबीर कार्यालयात लेखी आक्षेप दाखल केला आहे.
आक्षेपांची पडताळणी प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गासाठी २० जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तीन शेतकºयांच्या जमिनीची खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर एकाही शेतकºयाच्या जमिनीची खरेदी झालेली नाही. शासन शेतकºयांची दिशाभूल करून जमिनीची खरेदीसाठी दबाव टाकत असल्याचा आरोपी शेतकरी हक्क व बचाव कृती समितीने केला आहे.

Web Title: Rainfall of objections to 'Samrudhi' counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.