वर्ष अखेर अवकाळी पावसाचा तडाखा

By Admin | Published: January 1, 2015 12:13 AM2015-01-01T00:13:59+5:302015-01-02T00:47:52+5:30

जालना : अगोदरच दुष्काळी परिस्थितीने हवालदिल झालेल्या नागरिकांना सरत्या २०१४ या वर्षाला निरोप देताना अवकाळी पावसाचा तडाखा सहन करावा लागला.

Rainfall of year after year | वर्ष अखेर अवकाळी पावसाचा तडाखा

वर्ष अखेर अवकाळी पावसाचा तडाखा

googlenewsNext


जालना : अगोदरच दुष्काळी परिस्थितीने हवालदिल झालेल्या नागरिकांना सरत्या २०१४ या वर्षाला निरोप देताना अवकाळी पावसाचा तडाखा सहन करावा लागला. जिल्ह्यात बुधवारी दुपारनंतर अनेक भागात पाऊस झाला.
जिल्ह्यात सोमवारपर्यंत कडाक्याची थंडी होती. परंतु मंगळवारपासून ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली. या दिवशीही बदनापूर, जालना शहर व परिसरात हलक्या सरी बरसल्या. आज बुधवारी मात्र दुपारनंतर परतूर, रांजणी या भागात जोरदार पाऊस झाला. बदनापूर, अंबड, जाफराबाद, भोकरदन, चंदनझिरा, नागेवाडी इत्यादी भागातही सायंकाळी जोरदार पाऊस झाला. जालना शहर व परिसरात रात्री ८.३० च्या सुमारास विजांच्या गडगडाटांसह काही वेळ जोरदार तर नंतर रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. अचानक झालेल्या या पावसामुळे बाजारात खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांची मोठी अडचण झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Rainfall of year after year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.