मतिमंद पाल्यांना वाढविताना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:05 AM2021-09-22T04:05:12+5:302021-09-22T04:05:12+5:30
औरंगाबाद : मतिमंद मुलांना वाढवतांना पालकांना असंख्य आव्हानाचा सामना करावा लागतो. पालक, शिक्षक, समाज यांच्या सहकार्याशिवाय पालक संघाचा विकास ...
औरंगाबाद : मतिमंद मुलांना वाढवतांना पालकांना असंख्य आव्हानाचा सामना करावा लागतो. पालक, शिक्षक, समाज यांच्या सहकार्याशिवाय पालक संघाचा विकास शक्य नाही. एकजूटीने मतिमंद मुलांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे, यासाठी ‘मतिमंद पाल्यांना वाढविताना’ हे पुस्तक दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन बी. एन. राठी यांनी व्यक्त केले.
आर. पी. दुसे लिखित या पुस्तकाचे प्रकाशन राठी यांच्या हस्ते झाले. प्रवीण जोशी म्हणाले की, पुस्तकात दुसे यांनी व्यक्त केलेले रोखठोक मत आणि उपाय मतिमंद मुलांच्या पाल्यांना बळ देणारे आहे. सुषमा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन, तर ज्योती इरावने यांनी आभार मानले.
कॅप्शन
‘मतिमंद पाल्यांना वाढविताना’ पुस्तकाचे प्रकाशन करताना बी. एन. राठी, कर्नल समीर राऊत, मंजूषा राऊत, लेखक आर. पी. दुसे आदी मान्यवर.