आरोग्याची गुढी उभारून केली जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:04 AM2021-04-17T04:04:16+5:302021-04-17T04:04:16+5:30

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाज मंडळातर्फे कोराेनाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्यानिमित्त ‘गुढी माझी गृहिणी’ या स्पर्धेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. ...

Raising public awareness about health | आरोग्याची गुढी उभारून केली जनजागृती

आरोग्याची गुढी उभारून केली जनजागृती

googlenewsNext

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाज मंडळातर्फे कोराेनाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्यानिमित्त ‘गुढी माझी गृहिणी’ या स्पर्धेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष शंतनू चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेच्या महिला आघाडीतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली. औरंगाबादच्या डाॅ. अजिता अन्नछत्रे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

गुढीची सजावट शास्त्रोक्त पद्धतीने व पूजा पारंपरिक वेशभूषेत करणे, असे या स्पर्धेचे स्वरूप होते. रागिणी पुसेगावकर, प्रगती कुलकर्णी यांना अनुक्रमे द्वितीय, तृतीय तर सीमा गावरस व कल्पना जोशी यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. सरोज कलंत्रे यांनी परीक्षण केले. सचिव नरेश जोशी यांनी निकाल जाहीर केला. स्पर्धेसाठी अरविंद हस्तेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपाध्यक्ष रवी जेहुरकर, सहसचिव डॉ, अमोल पांडव, श्रीपाद मुगुटे, दत्तात्रय सुभेदार, मानसी एकबोटे, योगिनी देशमुख, रंजना सामग, संजीवनी कुलकर्णी यांनी स्पर्धेच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Web Title: Raising public awareness about health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.