Raj Thackeray in Aurangabad: अमितनंतर राज ठाकरेंना वळसा! औरंगाबादच्या क्रांती चौकात रस्ता चुकले, भलत्याच दिशेने गेले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 06:46 PM2022-04-30T18:46:26+5:302022-04-30T18:49:53+5:30
Raj Thackeray in Aurangabad: काल(दि.29) राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेदेखील औरंगाबादमध्ये रस्ता चुकल्याची घटना घडली होती.
औरंगाबाद:मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांचे औरंगाबादेत सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान आगमन झाले. मनसैनिकांनी ढोल ताश्यांच्या गरजात राज यांचे जंगी स्वागत केले. शहरात आल्यानंतर क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन केल्यानंतर राज ठाकरेंचा ताफा पुढे रवाना झाला. दरम्यान, अमित ठाकरे यांच्याप्रमाणे राज ठाकरेदेखील रस्ता चुकल्याची घटना यावेळी घडली.
अमित ठाकरेही रस्ता चुकले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या म्हणजेच 1 मे रोजी औरंगाबादमध्ये भव्य सभा आहे. सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मनसे नेत्यांसोबत राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे(Amit Thackeray) काल(दि.29) औरंगाबादेत दाखल झाले. शहरात आल्यानंतर त्यांचे बाबा पेट्रोल पंप परिसरात स्वागत होणार होते, पण गुगल मॅपमुळे रस्ता चुकले आणि थेट हॉटेलच्या दिशेने गेले. त्यानंतर आज राज ठाकरेही रस्ता चुकल्याची घटना घडली.
अमितनंतर राज ठाकरेंना वळसा! औरंगाबादच्या क्रांती चौकात रस्ता चुकले, भलत्याच दिशेने गेले...#RajThackeraypic.twitter.com/mKioeT8M2E
— Lokmat (@lokmat) April 30, 2022
ट्रॅफिकमध्ये अडकली राज यांची गाडी
राज ठाकरेंचा ताफा बाबा पेट्रोल पंपावरुन क्रांती चौकात दाखल झाला. शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करुन तिथून सरळ पुढे हॉटेल रामा मध्ये जायचे होते. मात्र, क्रांती चौकातून राज यांची गाडी परत बाबा पेट्रोल पंपाच्या दिशेने निघाली आणि त्यांचा ताफा हॉटेलच्या दिशेने गेला. रस्ता चुकल्याचे लक्षात आल्यानंतर राज ठाकरेंची गाडी चुन्नीलाल पेट्रोल पंपाच्या बाजूने एसएससी बोर्डाकडे गेली आणि तेथून परत क्रांती चौकात आली. ही बाब मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांना समजल्यावर ट्राफिक कंट्रोल करण्यासाठी मनसैनिकांनाच रस्त्यावर उतरावे लागले. मात्र रस्ता चुकल्याने राज ठाकरे यांना ट्राफिकचा सामना करावा लागलाच. काही वेळानंतर त्यांची गाडी ट्रॅफिकमधून हॉटेलच्या दिशेने निघाली.