राज ठाकरेंविरुद्धचे ‘ते’ दोषारोपपत्र रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:02 AM2018-12-04T05:02:19+5:302018-12-04T05:02:28+5:30
परप्रांतीयांना राज्यातून हकालण्यासाठी चिथावणीखोर भाषण देऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध दाखल दोषारोपपत्र औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी रद्द केले.
औरंगाबाद : परप्रांतीयांना राज्यातून हकालण्यासाठी चिथावणीखोर भाषण देऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध दाखल दोषारोपपत्र औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी रद्द केले.
२१ आॅक्टोबर २००८ रोजी औरंगाबाद- राजूर बसवर बदनापूरमध्ये १० ते १५ लोकांनी ‘राज ठाकरे जिंदाबाद’ अशा घोषणा देत दगडफेक केली. याविरुद्ध बसचालक अंबादास तेलंगरे यांनी त्याच दिवशी बदनापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राज ठाकरे यांच्यासह १० ते १५ अनोळखी व्यक्तींविरोधात भादंवि कलम ३३६, १४३, १०९, १३५, ११४, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान यांनुसार गुन्हा दाखल केला होता.