बारावीच्या निकालात राजर्षी शाहू, दयानंद विज्ञानचा दबदबा कायम

By Admin | Published: May 31, 2017 12:31 AM2017-05-31T00:31:49+5:302017-05-31T00:35:44+5:30

लातूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद विज्ञान महाविद्यालयाने निकालाची परंपरा कायम ठेवली आहे

Rajarshi Shahu, Dayanand University of Science in Class XII results | बारावीच्या निकालात राजर्षी शाहू, दयानंद विज्ञानचा दबदबा कायम

बारावीच्या निकालात राजर्षी शाहू, दयानंद विज्ञानचा दबदबा कायम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद विज्ञान महाविद्यालयाने निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. राजर्षी शाहू महाविद्यालयाचा ९९.८२ टक्के निकाल लागला असून, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा ९८.७१ टक्के निकाल लागला आहे.
राजर्षी शाहू महाविद्यालयातील विज्ञान शाखेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणारे २३ विद्यार्थी आहेत. तर ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणारे १२९ विद्यार्थी आहेत. विज्ञान शाखेत श्रुती सोमशंकर महाजन ९४.३ टक्के गुण घेऊन महाविद्यालयात प्रथम आली आहे.
पूजा अशोक लमदाडे ९४ टक्के गुण घेऊन द्वितीय आली असून, शिवानी वंदेकर, रुपाली मुळे ९३.०८ टक्के गुण घेऊन तृतीय आल्या आहेत.
वाणिज्य शाखेचा निकाल ९९.७५ टक्के लागला असून, ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणारे २६ तर ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणारे ६९ विद्यार्थी आहेत. सत्यजित चामले ९४.७७ टक्के गुण घेऊन महाविद्यालयात प्रथम आला आहे. राधिका भुतडा या विद्यार्थिनीने ९४.४६ टक्के गुण घेऊन द्वितीय तर मुक्ता देशपांडे ९४.१५ टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे.
कला शाखेचा निकाल ९६.७२ टक्के लागला असून अनुजा तिडके ही विद्यार्थिनी ८८.३१ टक्के गुण घेऊन महाविद्यालयात प्रथम आली आहे. महादेवी चापुले ८७.८५ द्वितीय, रिशा वाघमारे ८६.१५ तृतीय आली आहे.
या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थाध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ.पी.आर. देशमुख, सचिव अ‍ॅड. नारायणराव पाटील, प्रभारी सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, सहसचिव डॉ. डी. बी. गोरे, प्राचार्य एस.डी. साळुंके, उपप्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य एम.एम. दुरुगकर, पर्यवेक्षक प्रा. कल्याण कांबळे, प्रा. डी. के. देशमुख, प्रा. एन.बी. चव्हाण, प्रा. शिवाजी शिंदे, डॉ. ए.जे. राजू यांनी केले आहे.

Web Title: Rajarshi Shahu, Dayanand University of Science in Class XII results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.