महागाईविरोधात राकाँ-शिवसेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:01 AM2017-09-21T00:01:59+5:302017-09-21T00:01:59+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा कचेरीसमोर तर शिवसेनेने गांधी चौकात रस्त्यावर भाजी-भाकरी तयार करण्यासाठी चूल मांडत केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध केला.

Rakah-Shivsena movement against inflation | महागाईविरोधात राकाँ-शिवसेनेचे आंदोलन

महागाईविरोधात राकाँ-शिवसेनेचे आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा कचेरीसमोर तर शिवसेनेने गांधी चौकात रस्त्यावर भाजी-भाकरी तयार करण्यासाठी चूल मांडत केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध केला. शिवसेनेने औंढा व कळमनुरीतही अशाप्रकारचे आंदोलन करून प्रशासनास निवेदन दिले.
हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. यात आंतरराष्ट्रीय बाजारात किमती उतरल्या तरीही पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ झाल्याचा निषेध करण्यात आला. तर ही दरवाढ मागे घ्या, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कपात रद्द करून पूर्ण शिष्यवृत्ती द्या, राज्यातील भारनियमन बंद करा, राशनकार्डवरील साखर देणे बंद केले ती पुन्हा सुरू करा व शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्या, या मागण्यांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे हे आंदोलन केले. यावेळी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, डॉ.जयदीप देशमुख, आमेर अली, बाबू कदम, शेख शकील, खय्युम पठाण, खालेदभाई, राविकाँ जिल्हाध्यक्ष सुजय देशमुख, अभिजित देशमुख, नफिस पहेलवान, अमोल देशमुख, शेख जुनेद, विठ्ठल जाधव, महिला जिल्हाध्यक्षा सुमित्रा टाले, जि.प.सदस्या रत्नमाला चव्हाण आदींची उपस्थिती होती.
सेनेचेही आंदोलन
शिवसेनेच्या वतीने गांधी चौकात केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी चौकातच चूल मांडून त्यावर भाजी-भाकरी केली. महागाई कमी करण्याचे आश्वासन देणाºया भाजप सरकारने त्यावर कोणतीच उपाययोजना केली नसल्याने घोषणाबाजी केली.
जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात माजी जि.प.उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, नगरसेवक राम कदम, भानुदास जाधव, तालुकाप्रमुख कडूजी भवर, महिला आघाडीच्या किर्ती लदनिया, आनंदराव जगताप, शिवाजीराव कºहाळे, डॉ.रमेश शिंदे, गोपाल अग्रवाल, प्रताप काळे, शिवाजी जाधव, दिनकर गंगावणे, नारायण घ्यार, शंकर बांगर, गणेश शिंदे, डिगांबर बांगर, प्रकाश बांगर आदींची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: Rakah-Shivsena movement against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.